बनावट दस्तऐवज; मुख्याध्यापकावर गुन्हा

By Admin | Updated: April 8, 2017 00:02 IST2017-04-08T00:02:28+5:302017-04-08T00:02:28+5:30

बीड : बनावट दस्तऐवज तयार करून मुख्याध्यापक पदाची वैयक्तिक मान्यता मिळविल्याचे समोर आले.

Fake documents; Crime at the headmaster | बनावट दस्तऐवज; मुख्याध्यापकावर गुन्हा

बनावट दस्तऐवज; मुख्याध्यापकावर गुन्हा

संदीप बावचे -- जयसिंगपूर  कन्यागत महापर्वकाळाच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडीसह धार्मिक पर्यटनाला चालना मिळाली. तब्बल १२१ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला होता. त्यातील पहिल्या टप्प्यातील निधी गतवर्षी मिळाला होता. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ५६ कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये या निधीसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कन्यागतच्या उर्वरित निधीसाठी आता शिरोळ तालुक्यात पावसाळी अधिवेशनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नाशिक त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा होतो, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर बारा वर्षांनी गतवर्षी १२ आॅगस्टपासून सुरू झालेल्या कन्यागत महापर्वकाळाच्या निमित्ताने शिरोळ तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच १२१ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. यातील पहिल्या टप्प्यात ६५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून रस्ते, घाट, पार्किंग व्यवस्था, भक्तनिवास, सांस्कृतिक सभागृह, बसस्थानकाचे विस्तारीकरण यासह अन्य कामांसाठी निधी मंजूर झाला होता. पहिल्या टप्प्यातील निधीतून काही कामे मार्गी लागली. १२ आॅगस्ट २०१६ ला कन्यागत सोहळा उत्साहात पार पडला. वर्षभर हा सोहळा चालणार आहे. शासनाने ज्याप्रमाणे धार्मिक पर्यटनाचा पाया विस्तारित करण्याचे धोरण अवलंबले. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील निधी लांबणीवर पडल्याने तालुक्यातून नाराजीचा सूर उमटत आहे.

दर बारा वर्षांनी होणाऱ्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाळाच्या निमित्ताने तालुक्याला १२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. पहिल्या टप्प्यातील ६५ कोटी रुपये विकासासाठी मिळाले आहेत. उर्वरित ५६ कोटी रुपयांच्या निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. संबंधित विभागाला पत्रव्यवहार देखील केला आहे.
- उल्हास पाटील, आमदार

दुसऱ्या टप्प्यातील कामे
पोलिस दलासाठी आवश्यक सुविधा, रस्ते सुधारणा, खिद्रापूर येथे पूल बांधणे, नृसिंहवाडी येथे बहुमजली पार्किंग इमारत, भक्तनिवास, सांस्कृतिक सभागृह, भुयारी गटार, गणेशवाडी येथे वाहनतळ, सांस्कृतिक सभागृह, दत्त निवास, कवठेगुलंद-शेडशाळ येथे पालखी मार्ग रस्ता, खिद्रापूर येथे अंतर्गत रस्ते, नदीकाठ रस्ते, पेव्हिंग ब्लॉक स्वच्छतागृह, भुयारी आरसीसी गटार, शुक्लतीर्थ रस्ता डांबरीकरण, नृसिंहवाडी येथे सांडपाणी निचरा व्यवस्थापन यंत्रणा, जैव कचरा व्यवस्थापन, जयसिंगपूर बसस्थानक इमारत नूतनीकरण, कुरुंदवाड घाट, आदी प्रमुख कामांचा समावेश आहे.


शासनाकडून उपेक्षा
२५ फेब्रुवारी २०१६ ला मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कन्यागत महापर्वकाळ सोहळ्याकरिता १२१ कोटी ६४ लाख रुपयांच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती.
पहिल्या टप्प्यातील ६५ कोटी रुपयांचा निधीदेखील उशिरा का होईना मिळाला होता. त्यामध्ये कन्यागत सोहळा मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये उर्वरित निधीला मंजुरी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, निधी मंजूर झाला नाही.

Web Title: Fake documents; Crime at the headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.