शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

सुसज्ज मैदानांसाठी लोकचळवळ गरजेची-: राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवून एकजूट आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:56 IST

मैदाने कमी होत आहेत, आहे त्या मैदानांची दुरवस्था होत आहे, अशी ओरड होते; पण ही दुरवस्था होत असताना मैदाने सुस्थितीत आणण्यासाठी आपलेही योगदान यात असावे

ठळक मुद्देनागरिकांसह खेळाडूंचा पुढाकार हवा

प्रदीप शिंदे ।कोल्हापूर : मैदाने कमी होत आहेत, आहे त्या मैदानांची दुरवस्था होत आहे, अशी ओरड होते; पण ही दुरवस्था होत असताना मैदाने सुस्थितीत आणण्यासाठी आपलेही योगदान यात असावे असे नागरिकांनाही वाटणे गरजेचे आहे. मैदाने टिकवायची असतील तर ती वापरणाऱ्या नागरिकांनी, तरुणांनी, खेळाडूंनी पुढे येण्याची गरज आहे. अशी चळवळ प्रत्येक मैदानाच्या भागात सुरू झाल्यास शहरात मैदानांचे रूप बदलणे अवघड नाही. शहरातील लोकचळवळीतून शास्त्रीनगर मैदान, कसबा बावडा पॅव्हेलियन या मैदानांचा होत असलेला कायापालट याचे उत्तम उदाहरण आहे.

दहावी-बारावीची परीक्षा संपल्याने उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की मुलांना ओढ लागते ती मैदानाची; पण शहरात खेळाडू जास्त आणि मैदाने कमी अशी स्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. आहेत ती मैदाने भाडेतत्त्वावर मेळावे किंवा अन्य कामांसाठी देण्यात आली आहेत. मोकळ्या जागेवर वाहनांच्या पार्किंगचा विळखा आहे. उपलब्ध मैदानांवर खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध नसल्याने मुलांना विविध अडचणी येत आहेत. त्यामुळे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. मैदानांच्या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर कोल्हापूरचा नावलौकिक केला आहे.हे खेळाडू आहेत त्या सुविधांमध्येच विविध क्रीडांगणांवर सराव करीत आहेत.

शहरातील महानगरपालिकेच्या गांधी मैदान, मेजर ध्यानचंद स्टेडियम, शास्त्रीनगर मैदान, रुईकर कॉलनी, सासने मैदान, मेरी वेदर मैदान, दुधाळी पॅव्हेलियन, कसबा बावडा पॅव्हेलियन यांसह शिवाजी स्टेडियम, शाहूपुरी जिमखाना, राजाराम कॉलेज, तपोवन मैदान अशी मोठी मैदाने आहेत.मात्र, येथील बहुतांश मैदानांवर खेळाडूंना आवश्यक सुविधांचा अभाव आहे. मैदानांना संरक्षण भिंत नसल्याने या ठिकाणी मोकाट जनावरांचा मुक्त वावर असतो. रात्रीच्या वेळी ही मैदाने ओपन बार म्हणून वापरली जातात. काही समारंभ असो किंवा अन्य कामांसाठी येथे पार्किंग नित्याचे झाले आहे; तर काही मैदानांवर दरवर्षी काही मेळावे, प्रदर्शने ही हे नित्याची झाली आहेत.खासगी समर कॅम्पवाल्यांनी मैदानावर कब्जा केलेला आहे. यामुळे मुलांना खेळण्यासाठी तर ज्येष्ठ नागरिक व नागरिकांना फिरण्यासाठी मोठी समस्या होते.

या समस्येला जशी महानगरपालिका कारणीभूत आहेच; तसेच नागरिकही. किती नागरिक मैदान सुस्थितीत ठेवण्यासाठी तळमळ दाखवतात? याबाबत उदासीनताच दिसून येते. महानगरपालिकेचे तोकडे नियोजनही याला कारणीभूत असले तरी लोकसहभाग आणि लोकप्रतिनिधीची साथ मिळाल्यास महानगरपालिकेची शास्त्रीनगर, कसबा बावडा पॅव्हेलियन, रुईकर कॉलनी मैदानाचा झालेला विकास ही तीन ठसठशीत उदाहरणे आहेत.मैदानांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, मंडळे, खेळाडू आणि नागरिकांनी मैदान सुस्थितीत व निगा राखण्यासाठी मैदानात उतरले पाहिजे. विशेष म्हणजे, त्या परिसरातील नागरिकांनी राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवून मैदानासाठी एक होऊन चळवळ प्रत्येक भागात सुरू झाल्यास मैदानांवरील सर्व समस्या काही वेळातच सुटतील. अशी चळवळ उभी करणे फार अवघड नाही. 

ज्याप्रमाणे आपले घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे मैदान स्वच्छ ठेवल्यास मनपाच्या कर्मचाऱ्यांची गरजही भासणार नाही. प्रत्येक मैदान परिसरातील तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मैदानातील तळिराम हटविण्यासाठी चळवळ उभी केल्यास, मैदानातील ओपन बारही बंद होईल.

- सुहास साळोखे, माजी खेळाडूमैदानाच्या प्रश्नी प्रत्येकाने राजकारण बाजूला ठेवून खेळाडू म्हणूनच मैदानाच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे. ही जबाबदारी स्थानिक नागरिकांचीही आहे. तिला शासनाची साथ मिळणे गरजेचे आहे.- सुरेश ढोणुक्षे, माजी नगरसेवक

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर