गुडाळमध्ये सत्तेसाठी दोन्ही आघाडीत बिघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:19 IST2021-01-08T05:19:20+5:302021-01-08T05:19:20+5:30

येथील ग्रामपंचायतीवर भोगावतीचे ज्येष्ठ संचालक ए. डी. पाटील, माजी संचालक महादेवराव कोथळकर व भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ...

Failure on both fronts for power in Gudal | गुडाळमध्ये सत्तेसाठी दोन्ही आघाडीत बिघाडी

गुडाळमध्ये सत्तेसाठी दोन्ही आघाडीत बिघाडी

येथील ग्रामपंचायतीवर भोगावतीचे ज्येष्ठ संचालक ए. डी. पाटील, माजी संचालक महादेवराव कोथळकर व भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे यांची सत्ता आली होती. यावेळी सत्तारूढ आघाडीत गेल्यावेळी विरोधात आघाडीत असणारे भोगावतीचे माजी संचालक व्ही. डी. पाटील यांनी पाठिंबा दिला आहे तर सत्तारूढ आघाडीतील काही मंडळी यावेळी उद्योगपती शिवाजी भिकू पाटील, भोगावतीचे माजी संचालक शामराव पाटील व तुकाराम पाटील यांच्या विरोधी आघाडीमध्ये सामील झाले आहेत. सत्तेसाठी दोन्ही आघाडींचे गावातील व परगावी असलेल्या मतदारांना आमिषे दाखवून आपल्या आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी दोन्ही आघाडींचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत तशी या ग्रामपंचायतीची ही निवडणूक अटीतटीची होणार हे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Failure on both fronts for power in Gudal