शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांकडून महाविकास आघाडीत मतभेद करण्याचे डाव : शंभुराजे देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 11:46 IST

Shambhuraj Desai, kolhapur, BJP, Shiv Sena, politics देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेचा भगवा आता संपला असल्याच्या आरोपाचा गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी फडणवीस अशा प्रकारचे बेछूट आरोप करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देफडणवीसांकडून महाविकास आघाडीत मतभेद करण्याचे डाव : शंभुराजे देसाई शिवसेनेचा भगवा संपल्याच्या आरोपाचा घेतला समाचार

कोल्हापूर : देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेचा भगवा आता संपला असल्याच्या आरोपाचा गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी फडणवीस अशा प्रकारचे बेछूट आरोप करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना हा पक्ष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा आहे. आजही या विचारावरच काम सुरू आहे. फडणवीस जबाबदार विरोधी पक्षनेते असल्यामुळे सरकारविरोधात टीका करण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय राहिलेला नसल्याचा टोलाही देसाई यांनी लगावला.शिवसेनेचा कोल्हापुरातील दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंग हॉलमध्ये पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी मेळावा झाला. यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.देसाई म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे ह्यपुणे पदवीधरह्णमधून अरुण लाड, शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर या उमेदवारांना निवडून आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मेळावा घेतला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी मिळून प्रचाराचे नियोजन झाले आहे. तालुकानिहाय मेळावे घेतले जात आहेत. मतदानाची टक्केवारी जास्त करण्यावर महाविकास आघाडीचा भर आहे. समन्यवयाने, एका विचाराने काम सुरू आहे. यामध्ये शिवसेना आपली जबाबदारी ताकदीने पार पाडेल.देसाई म्हणाले...

  • एस.टी.प्रमाणेच महावितरणबाबतही मदत देण्याचा सहानुभूतिपूर्वक विचार केला जाईल.
  • कोरोनाची दुसरी लाट येईल, असे अपेक्षित धरून सर्व उपाययोजना केल्या आहेत.
  • कोविड सेंटर तात्पुरती बंद केली आहेत.
  • आवश्यक ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.
  • परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शासन सज्ज आहे.
  • पालकांची संमती, रुग्णसंख्या कमी असेल तरच शाळा सुरू; जिल्हाधिकाय्रांना सर्वाधिकार
  • १२ जणांच्या राज्यपालनियुक्त आमदार पदाबाबत राज्यपाल सकारात्मक विचार करतील.
  • महिला सुरक्षा कायदा (दिशा ॲक्ट) प्रारूप स्वरूपात अंतिम टप्प्यात.

महाविकास आघाडीत निधीवरून वाद नाहीत.निधीवाटपात महाविकास आघाडीत दुजाभाव होत असल्याचे आरोप होत असल्याबाबत विचारले असता देसाई म्हणाले, प्रत्येकाला अधिकचा निधी मिळावा, अशी अपेक्षा आहे. कोरोनामुळे उद्योग-व्यवसायांवर परिणाम झाला. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत अपेक्षित उत्पन्न जमा झाले नाही. निधी देण्यात दुजाभाव नसून महाविकास आघाडीत समन्वय आहे. मुख्यमंत्री सर्वांशी समतोल राखण्याचे आणि न्याय देण्याचे काम करीत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणShambhuraj Desaiशंभूराज देसाईkolhapurकोल्हापूरBJPभाजपाShiv Senaशिवसेना