शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

आर्थिक अरिष्टातील साखर उद्योगाला इथेनॉलचा ‘बूस्टर’

By राजाराम लोंढे | Updated: July 25, 2022 14:26 IST

बाजारपेठेची भूक ओळखून तेवढ्याच साखरेचे उत्पादन करुन उर्वरित इथेनॉलची निर्मिती करण्यास कारखान्यांनी सुरुवात केल्याने हा उद्योग सावरण्यास मदत होत आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : उसाचे वाढलेले क्षेत्र, त्यातून साखरेच्या उत्पादनात झालेल्या मोठ्या वाढीमुळे साखरेचे दर अस्थिर झाले होते. परिणामी सगळा साखर उद्योगच आर्थिक अरिष्टात सापडला होता. मात्र बाजारपेठेची भूक ओळखून तेवढ्याच साखरेचे उत्पादन करुन उर्वरित इथेनॉलची निर्मिती करण्यास कारखान्यांनी सुरुवात केल्याने हा उद्योग सावरण्यास मदत होत आहे.आगामी साखर हंगामात जिल्ह्यात २५ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार आहे. स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेच्या दरातील अस्थिरतेमुळे साखर उद्योग अडचणीत आला. अडचणीत येण्यात हे जरी कारण असले तरी काही कारखान्यांमधील गैर व्यवस्थापन ही तितकेच कारणीभूत ठरले. हंगाम २०१५ पासून कारखाने अधिक अरिष्टात सापडत गेले.उसाची एफआरपी देण्यासाठी या कालावधीत तीन ते चार वेळा कारखान्यांना कर्जे घ्यावी लागली. साखरेचे आयात, निर्यात धोरणाचा फटका बसल्याने साखरेचे दर घसरत गेले. केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव निश्चित केला, मात्र एकीकडे एफआरपी वाढत असताना दुसऱ्या बाजूला त्या पटीत साखरेचे दर वाढले नाहीत, हेही वस्तुस्थिती आहे.

इथेनॉल, निर्यात धोरणामुळे साखर स्थिर

इथेनॉल निर्मिती केल्यामुळे साखरेचे उत्पादन कमी झाले, त्यात निर्यात धोरणामुळे गेल्या वर्षभर साखरेचे दर स्थिर राहिले आहेत. घाऊक बाजारात प्रति क्विंटल ३१०० ते ३२५० रुपयांपर्यंत साखर राहिली असली तरी किरकोळ बाजारात ३८०० पर्यंत आहे.

हे कारखाने करतात इथेनॉल निर्मिती दत्त-शिरोळ, गुरुदत्त-टाकळीवाडी, वारणा, दालमिया, शाहू, सदाशिवराव मंडलीक, संताजी घोरपडे, पंचगंगा, उदयसिंगराव गायकवाड.

‘कुंभी’, ’बिद्री’चा प्रकल्प प्रस्तावित

बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा वेदगंगा व कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्प प्रस्तावित आहेत. येत्या वर्षभरात ते चालू होणार असल्याने जिल्ह्यात इथेनॉलचे उत्पादन वाढणार आहे.

गेल्या पाच-सहा वर्षात साखर उद्याेग कधी नव्हे इतका अडचणीत आला. आता बाजारपेठेच्या गरजेनुसार साखर उत्पादन, इथेनॉल निर्मिती व निर्यात या त्रिसुत्रीमुळे साखर उद्योग हळूहळू बाहेर पडण्यास मदत होईल. - विजय औताडे (साखर उद्योगातील तज्ज्ञ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने