शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: पंचगंगा नदीपात्रातील मृत माशांमागे परिसरातील कारखानेच, अभ्यासकांचा निष्कर्ष 

By संदीप आडनाईक | Updated: January 9, 2023 13:53 IST

मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर

संदीप आडनाईककोल्हापूर : पंचगंगा नदीपात्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मृत मासे तरंगताना आढळत आहेत. शिये परिसर, राजाराम बंधारा आणि वळीवडे-गांधीनगर, तेरवाड येथील नदीपात्रापासून इचलकरंजीपर्यंत मृत माशांचे खच आढळल्याने नदी प्रदूषणाला या परिसरातील कारखानेच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अभ्यासकांनी काढला असून या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनाही जबाबदार धरण्याची मागणी करण्यात आली आहे.गेल्या चार दिवसांपासून पंचगंगा नदीपात्रात आढळलेल्या मृत माशांप्रकरणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या दिलीप देसाई यांनी इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या पाण्याचे केवळ नमुनेच तपासण्यासाठी नेले आहेत. तसेच मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी काही ठिकाणच्या मृत माशांना नदीपात्रातून बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

याप्रकरणी मंडळामार्फत सोमवारी नदीपात्रातील प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या कारखान्यांना नोटीस काढण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रदूषणाकडे जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे त्यांनाही जबाबदार धरावे, अशी मागणी दिलीप देसाई यांनी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्रदूषण रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष पुण्याचे विभागीय आयुक्त असून त्यात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकांचे आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. अशा प्रदूषणांवर नजर ठेवण्यासाठी आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी आठवड्यातून एकदा बैठक घ्यायची असते, अशीही माहिती देसाई यांनी दिली.कारखाने कारणीभूतपंचगंगा नदीपात्रातील पाणी केवळ एका दिवसात प्रदूषित झालेले नाही. भोगावती, राजाराम बंधारा, इचलकरंजी परिसरातील कारखाने या प्रदूषणाला कारणीभूत आहेत. याशिवाय छोट्या कारखान्यांची रसायनेही याला कारणीभूत आहेत. गांधीनगर परिसरातील फरसाण निर्मिती करणाऱ्या कारखान्यांतूनही नदीपात्रात आणून सोडलेले पदार्थ या प्रदूषणाला कारणीभूत आहेत, असे पर्यावरण अभ्यासकांचा निष्कर्ष आहे.

मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापरमासेमारी करणारे मच्छीमार मोठ्या प्रमाणात ब्लिचिंग पावडरचा वापर करत असल्यामुळे त्यामुळेही नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. त्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात नदीचे पाणी हिरवे होत नाही. याचा सविस्तर अहवाल तयार करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfishermanमच्छीमारpollutionप्रदूषणriverनदी