मुरगूडच्या जनावर बाजारात सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:37+5:302021-09-10T04:30:37+5:30
उपोषणाचा इशारा मुरगूड : मुरगूड शहरात भरणाऱ्या जनावरांचा बाजारात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या जनावरांचा ...

मुरगूडच्या जनावर बाजारात सुविधा द्या
उपोषणाचा इशारा
मुरगूड : मुरगूड शहरात भरणाऱ्या जनावरांचा बाजारात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या जनावरांचा व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या समस्या दूर कराव्यात, अन्यथा पालिकेच्या दारात आपण उपोषण करू, असा इशारा निवेदनाद्वारे व्यापाऱ्यांनी दिला आहे.
मुरगूडचा जनावरांचा बाजार हा पश्चिम महाराष्ट्रातील मोठा आणि प्रसिद्ध बाजार म्हणून ओळखला जातो, पण सध्या मात्र ज्या ठिकाणी हा बाजार भरतो तिथे प्रचंड असुविधा निर्माण झाल्या आहेत. सध्या या ठिकाणी मोठा चिखल झाला आहे. जनावरे उतरण्यासाठी धक्का नाही, तर जनावरे उभा करण्याच्या ठिकाणी विविध अतिक्रमणे होऊन जागा व्यापली गेली आहे. जनावरांना आणि व्यापाऱ्यांनाही पिण्यासाठी पाण्याची सोय नाही. अशा अनेक गैरसोयी बाजारात आहेत. पालिकेने तत्काळ या गैरसोयी दूर कराव्यात, अन्यथा पालिका दारात उपोषण करण्याचा इशारा या व्यापाऱ्यांनी दिला आहे.
या निवेदनावर शशिकांत गोधडे, प्रशांत मोरबाळे, प्रकाश रावण, नेताजी हासबे, प्रवीण निकम, विनायक हासबे, सुखदेव पाटील, सदाशिव गोधडे, बाजीराव उपलाने, उत्तम पाटील, प्रकाश पाटील, तुकाराम पाटील आदींच्या सह्या आहेत. हे निवेदन पालिका अधिकारी दिलीप कांबळे यांना देण्यात आले.
फोटो ओळ :- मुरगूडमधील जनावर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी बाजारात विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन देताना सर्व व्यापारी.