चेहरा रंगवा स्पर्धेत वसुप्रिया, सानव्ही प्रथम
By Admin | Updated: March 9, 2015 23:44 IST2015-03-09T23:20:52+5:302015-03-09T23:44:11+5:30
निसर्गमित्र संस्थेचा उपक्रम : वनस्पतीजन्य रंगनिर्मितीचे प्रात्यक्षिक सादर

चेहरा रंगवा स्पर्धेत वसुप्रिया, सानव्ही प्रथम
कोल्हापूर : नेहमीच्या वापरातील फळभाज्या, फुले यापासूनसुद्धा तयार केलेल्या नैसर्गिक रंगांनी चेहरा रंगविणे स्पर्धेत वसुप्रिया वेल्हाळ व सानव्ही लोखंडे यांनी आपापल्या गटांत प्रथम क्रमांक पटकाविला.
यावेळी निसर्ग मित्र संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घरच्या घरी रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. ते पाहून मुले व पालक भारावून गेले. निसर्ग मित्र संस्था व नाईस प्ले ग्रुपच्यावतीने या वनस्पतीजन्य रंगांनी चेहरा रंगविणे स्पर्धेचे आयोजन केले होते.
मंगळवार पेठेतील बेलबाग येथे या स्पर्धेदरम्यान देवासाठी वाहिलेल्या हारांची फुले, जेवणासाठी वापरणारे बीट, हळकुंड, डाळिंब यापासून रंगांची निर्मिती कशी होते, याची सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित मुले व पालकांना हे वनस्पतीजन्य रंग तयार करून दाखविले. स्पर्धेमध्ये दोन गट केले होते. पहिला गटात स्वत: नैसर्गिक रंग तयार करून चेहरा रंगविणे व दुसऱ्या गटात तयार केलेला नैसर्गिक रंग घेऊन चेहरा रंगविणे अशी स्पर्धा घेतली. या स्पर्धेत एकूण ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून अर्चना देसाई, दीप्ती वर्दम, अनुराधा मेहता यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संयोजन प्रेमा श्रीखंडे, वनिता चव्हाण, राणिता चौगुले, अजित अकोळकर, भरत चौगुले यांनी केले. (प्रतिनिधी)
स्पर्धेचा गटनिहाय निकाल
पहिला गट : वसुप्रिया वेल्हाळ, जान्हवी कांबळे, तिसरा क्रमांक विभागून अनुश्का पाटील व हरीष पवार, तर उत्तेजनार्थ वरद पिसाळ. दुसरा गट : सानव्ही लोखंडे, राजवीर पवार, दर्श हवळ, उत्तेजनार्थ आराध्य पाटील.
आपण स्वत: वनस्पतीजन्य रंग तयार करून, रंगपंचमी खेळणे याचा आनंद वेगळाच आहे. या वनस्पतीजन्य रंगांमुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. रासायनिक रंगांतून होणारी विषबाधा टाळायची असेल, तर वनस्पतीजन्य रंगांत रंगपंचमी खेळणे उत्तम. त्यामुळेच बालपणापासून वनस्पतीजन्य रंगांचे महत्त्व मुलांना कळावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
- अनिल चौगुले, कार्यवाह, निसर्ग मित्र संस्था