प्रतिकूल परिस्थितीत धैर्याने सामोरे जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:22+5:302020-12-30T04:31:22+5:30
खोची : वाचनाने माणूस ज्ञानी बनतो. साहजिकच आत्मविश्वास वाढून तो उत्तुंग यश संपादन करू शकतो. स्वतःचे मार्गदर्शक स्वतः बना, ...

प्रतिकूल परिस्थितीत धैर्याने सामोरे जा
खोची : वाचनाने माणूस ज्ञानी बनतो. साहजिकच आत्मविश्वास वाढून तो उत्तुंग यश संपादन करू शकतो. स्वतःचे मार्गदर्शक स्वतः बना, स्वतःवर प्रेम करा. कितीही संघर्ष करावा लागला तरी हिम्मत सोडू नका. धीटपणे धैर्याने सामोरे जा. यशाचे समाधान निश्चित मिळेल, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी केले.
मिणचे (ता. हातकणंगले) येथे विद्या फौंडेशन व वीरसेवादल यांच्यावतीने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा व करिअर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तानाजी पोवार होते.
जॉर्ज क्रूझ म्हणाले, परीक्षेला सामोरे जाताना अभ्यास समजून घेतला पाहिजे. जे माहिती नसते ते जाणून घेतले पाहिजे. कोणतीही भीती बाळगली नसली पाहिजे. आपल्यापेक्षा अधिकची माहिती असणाऱ्यांची संगत केल्यास दिशा चुकत नाही. परिस्थितीला कधीही दोष न देता प्रतिकूलतेशी संघर्ष करा. त्यातून मिळणारे लक्षवेधी असते.
यावेळी विक्रीकर निरीक्षक प्रज्ञा कुरणे (ठाणे), तानाजी पोवार, विश्वजित जाधव, वैशाली जाधव यांची भाषणे झाली. यावेळी राम करले, मोहन जाधव, कुस्तास डिसोझा, सुधीर कुरणे, सतीश बरगे, शकील जमादार उपस्थित होते.
फोटो ओळी - मिणचे येथे आयोजित व्याख्यानात प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रज्ञा कुरणे, सतीश बरगे उपस्थित होते. (छाया - आयुब मुल्ला)