शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीबरोबरच मानवी चुकांमुळे महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 11:04 IST

गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकाच वेळी धरण तसेच नदीक्षेत्रांत झालेला दुप्पट पाऊस, पूररेषेतील बांधकामे तसेच ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ तंतोतंत हाताळण्यात झालेल्या मानवी चुका यांमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे. अलमट्टी धरणातील पाणी सोडण्यातही हलगर्जीपणा झाल्याचे सांगण्यात येते.

ठळक मुद्देअतिवृष्टीबरोबरच मानवी चुकांमुळे महापूरजाणकारांचा दावा : बांधकामामुळे नद्यांचे बेसिन झाले कमी

भारत चव्हाण

कोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकाच वेळी धरण तसेच नदीक्षेत्रांत झालेला दुप्पट पाऊस, पूररेषेतील बांधकामे तसेच ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ तंतोतंत हाताळण्यात झालेल्या मानवी चुका यांमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसल्याचा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे. अलमट्टी धरणातील पाणी सोडण्यातही हलगर्जीपणा झाल्याचे सांगण्यात येते.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांना बसलेल्या महापुराला कोणतीही एक घटना जबाबदार नाही तर अनेक कारणे आहेत. निसर्गाचा प्रकोप तर आहेच; शिवाय मानवी चुकासुद्धा झाल्याची बाब समोर येत आहे. यावर्षी जून महिना कोरडा गेला, पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातही तशीच अवस्था होती.

जुलैच्या शेवटी-शेवटी पावसाने जोर धरला. पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील पाणी सोडायचे की नाही अशा संभ्रमात जलसंपदाचे अधिकारी होते. अलमट्टी धरणाचे जबाबदार अधिकारीही अशाच संभ्रमात राहिले. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी पाणी अडवून ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले.अचानक जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर धरला आणि आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात तर तो अधिकच वाढला. धरणक्षेत्र तसेच नदीक्षेत्रात एकच वेळी दुप्पट-तिप्पट पाऊस पडू लागला. बघता-बघता कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील धरणांतून विसर्ग वाढवला. कृष्णा, कोयना, वारणा व पंचगंगा नद्यांना एकाच वेळी महापूर आल्यामुळे त्याची तीव्रता वाढली.

महापुराचे पाणी अलमट्टी धरणाच्या दिशेने पुढे सरकत होते, तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनीही येणारे पाणी अडवून ठेवण्याचे काम केले. परिणामी महापुराची परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा फटका कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला बसला, असा दावा जाणकारांकडून करण्यात येत आहे.

पूररेषेतील बांधकामांचा फटकानदीकाठावर होत असलेले अतिक्रमण हेही एक कारण महापुराबद्दल सांगितले जात आहे. प्रत्येक शहरात, गावात नदीकाठावर पूररेषेच्या आत मोठ्या प्रमाणात बांधकामे होऊ लागली आहेत. त्यावर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे नद्यांचे पाणी साठवून ठेवण्याची (बेसिन) क्षमता कमी होत असून पाणी नागरी वस्तीत घुसत आहे. मोठा पाऊस झाला की नदी आपल्या मूळ पात्रात महापुराचे पाणी सामावून घेऊ शकत नाही.

गेट आॅपरेशन शेड्युल चुकलेपाच आॅगस्टपासून महापुराची वाटचाल विध्वंसाकडे सुरू झाली तेव्हा धरणाचे ‘गेट आॅपरेशन शेड्युल’ चुकत असल्याचे जाणवत होते. दुप्पट-तिप्पट पाऊस होत असताना सगळी धरणे एकाच वेळी भरली. त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला. अलमट्टी धरणात प्रतिसेकंद ६ लाख ८० हजार क्युसेक पाणी येऊन मिसळत असताना तेथील अधिकाऱ्यांनी त्याच्या बदल्यात ५ लाख ३० हजार क्युसेक्स पाणी धरणातून सोडण्यात येत होते. याचा अर्थ प्रतिसेकंद दीड लाख क्युसेक्स पाणी धरणात साठत होते. म्हणूनच पाण्याची फुग वाढली, पाणीही लवकर उतरत नव्हते, असे या क्षेत्रातील अभ्यासक बी. एस. घुणकीकर यांनी सांगितले.कोल्हापुरातील पाऊस

  •  गतवर्षी १२ आॅगस्टपर्यंत झालेला पाऊस - ७७७ मी.मी.
  • यावर्षी १२ आॅगस्टपर्यंत झालेला पाऊस - १४२८ मी.मी.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर