उतारा, टनेज देणाऱ्या उसाचे संशोधन गरजेचे

By admin | Published: February 11, 2015 11:41 PM2015-02-11T23:41:43+5:302015-02-12T00:26:13+5:30

गणपतराव पाटील : शिरोळ दत्त कारखाना कार्यस्थळावर ऊस पीक परिसंवाद

Extraction, tonnage sugarcane should be researched | उतारा, टनेज देणाऱ्या उसाचे संशोधन गरजेचे

उतारा, टनेज देणाऱ्या उसाचे संशोधन गरजेचे

Next

शिरोळ : भविष्यकाळात जास्तीत जास्त साखर उतारा व जास्तीत जास्त एकरी उसाचे टनेज देणाऱ्या ऊस जातीचे संशोेधन करणे ही काळाची गरज आहे. अशा ऊस जातीचे संशोधन केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर कारखान्यांनाही किफायतशीर होणार आहे, असे प्रतिपादन श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले.
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ऊस उत्पादन व साखर उतारा देणाऱ्या ऊस जातींविषयी चर्चा व मार्गदर्शन परिसंवाद पार पडला. यावेळी अध्यक्ष पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या चर्चासत्रासाठी कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यांतील नामांकित साखर कारखान्यांचे मुख्य शेती अधिकारी, ऊस विकास अधिकारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोईमतूर ऊस प्रजनन संस्थेचे डायरेक्टर डॉ. बक्षिराम, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे, शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. रेपाळे यांनी ऊस जाती, बियाणे निवड, साखर उतारा, खत व्यवस्थापन, रोग, जमीन, पाणी यासंबंधी मार्गदर्शन केले.
चर्चासत्रास मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, माती परीक्षण अधिकारी ए. एस. पाटील, रवींद्र हेरवाडे, चिफ केमिस्ट विश्वजित शिंदे, संजय यादव, आदी उपस्थित होते.

Web Title: Extraction, tonnage sugarcane should be researched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.