मगदूम हॉस्पिटलने उकळले रुग्णांकडून जादा पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:16 IST2021-01-08T05:16:06+5:302021-01-08T05:16:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : घोटवडे (ता.पन्हाळा) येथील भाऊसाो धोंडिराम कांबळे (वय ७०) या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य ...

Extra money from patients boiled by Magdoom Hospital | मगदूम हॉस्पिटलने उकळले रुग्णांकडून जादा पैसे

मगदूम हॉस्पिटलने उकळले रुग्णांकडून जादा पैसे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : घोटवडे (ता.पन्हाळा) येथील भाऊसाो धोंडिराम कांबळे (वय ७०) या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफतच शस्त्रक्रिया होत असताना त्यांच्याकडून शास्त्रीनगरातील मगदूम इंडो सर्जरी या रुग्णालयाने ५९६६ रुपये जादा उकळले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. रुग्णालयाला जादा पैसे घेतल्याबद्दल नोटीस बजावली असल्याची माहिती या योजनेचे व्यवस्थापक प्रवीण मोटे यांनी दिली आहे. रुग्णालय हे प्रकरण मिटविण्यासाठी संबंधित रुग्णास ६०६६ रुपयांचा धनादेश देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

याबद्दल कांबळे यांचा मुलगा विजय कांबळे यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन या योजनेच्या मुंबई कार्यालयाने जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे व विभागीय व्यवस्थापक किरण कुंडलकर यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार रुग्ण कांबळे यांचे योजनेतर्गत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेसाठी १० नोव्हेंबर २०२० ला मंजुरी देण्यात आली; परंतु ही शस्त्रक्रिया न करता डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांच्या लेखी सहमतीने ओपन शस्त्रक्रिया केली. त्यानंतर १४ नोव्हेंबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला परंतु कांबळे यांना शस्त्रक्रिया केलेल्या ठिकाणी त्रास होऊ लागल्याने त्यांना परत रुग्णालयात उपचारासाठी बोलविले. १८ ते २३ नोव्हेंबर २०२० या काळात कांबळे यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले. या रुग्णास तपासणीसाठी झालेला खर्च परत करण्यास रुग्णालय तयार असल्याचे रुग्णालयाने तोंडी सांगितले असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. रुग्णालयाने तपासणीसाठी ४३१६, रक्ताच्या बाटलीसाठी १६५० असा ५९६६ इतका खर्च आला असल्याचे तक्रारदाराने तोंडी सांगितले आहे. कोविड चाचणी व एचआरसीटीकरिताही वेगळा खर्च आला पण त्याची बिले नाहीत, असे रुग्णाच्यावतीने सांगण्यात आले.

वरिष्ठांनी निर्णय घ्यावा..

डॉ. मगदूम यांनी केलेल्या उपचाराबाबत आम्हाला मत प्रदर्शित करणे शक्य नाही. वरिष्ठांनी याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे मत चौकशी समितीने नोंदवले आहे. हे प्रकरण जिल्हा तक्रार निवारण समितीमध्ये चर्चेला घेण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनीही तक्रारदारास कळविले असल्याचे माहिती अधिकार पत्रात म्हटले आहे.

Web Title: Extra money from patients boiled by Magdoom Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.