थेट पाईपलाईन योजनेचे होणार बाह्य लेखापरीक्षण, महापालिकेने दिले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:24 IST2021-03-26T04:24:27+5:302021-03-26T04:24:27+5:30

कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्याच्या स्थानिक संस्था निधी संचालनालयामार्फत लेखापरीक्षणाच्या प्रस्तावानंतर आता थेट पाईपलाईन योजनेच्या कामकाजाचे बाह्य लेखापरीक्षण करण्याचे आदेश ...

External audit of direct pipeline scheme will be done, order given by Municipal Corporation | थेट पाईपलाईन योजनेचे होणार बाह्य लेखापरीक्षण, महापालिकेने दिले आदेश

थेट पाईपलाईन योजनेचे होणार बाह्य लेखापरीक्षण, महापालिकेने दिले आदेश

कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्याच्या स्थानिक संस्था निधी संचालनालयामार्फत लेखापरीक्षणाच्या प्रस्तावानंतर आता थेट पाईपलाईन योजनेच्या कामकाजाचे बाह्य लेखापरीक्षण करण्याचे आदेश जीकेसी कंपनीला महापालिकेने दिले आहेत. याचे पत्र जलअभियंता यांनी कंपनीला दिले. आम आदमी पार्टीने महापालिकेतील विविध विभागांचे बाह्य लेखापरीक्षण करावे, ही मागणी लावून धरत सातत्याने निवेदने व आंदोलने करून पाठपुरावा केला होता. याची दखल घेत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निर्देशानुसार महापालिकेने आदेश काढले.

घरफाळा घोटाळा, थेट पाईपलाईन योजनेतील दिरंगाई याबाबत वस्तुस्थिती समोर येऊन कारवाई व्हावी, यासाठी आम आदमी पार्टीने बाह्य लेखापरीक्षणाची मागणी केली होती. महापालिकेने दिलेल्या आदेशामुळे आता याबाबत बऱ्याच बाबी समोर येणार असून, 'आप'ने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

Web Title: External audit of direct pipeline scheme will be done, order given by Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.