विविध ७८ कंत्राटी प्राध्यापकांना तीन महिन्यांची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 11:40 AM2020-12-05T11:40:39+5:302020-12-05T11:42:44+5:30

Shivaji University, kolhapur, Professor शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या ७८ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला. त्यासह नव्या आर्थिक वर्षातील ताळेबंद हा अधिसभेसमोर सादर करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर सचिवपदी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते.

Extension of three months to various 78 contract professors | विविध ७८ कंत्राटी प्राध्यापकांना तीन महिन्यांची मुदतवाढ

विविध ७८ कंत्राटी प्राध्यापकांना तीन महिन्यांची मुदतवाढ

Next
ठळक मुद्देविविध ७८ कंत्राटी प्राध्यापकांना तीन महिन्यांची मुदतवाढ शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचा निर्णय : ताळेबंदाला मंजुरी

 कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या ७८ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला. त्यासह नव्या आर्थिक वर्षातील ताळेबंद हा अधिसभेसमोर सादर करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर सचिवपदी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते.

विद्यापीठामध्ये सध्या कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या अधिविभागांमध्ये सध्या ८४ नियमित प्राध्यापक, तर ७८ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक कार्यरत आहेत. यातील कंत्राटी प्राध्यापकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मुदतवाढ दिली होती.

या प्राध्यापकांची मुदत सोमवार (दि.७) संपणार होती. त्यामुळे पुनर्नियुक्तीबाबत कोणता निर्णय होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते. व्यवस्थापन परिषदेने या कंत्राटी प्राध्यापकांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यासह पुढील कालावधीसाठी प्राध्यापकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया येत्या १५ दिवसांत सुरू करण्याची सूचना विद्यापीठ प्रशासनाला दिली.

विद्यापीठाचे अंदाजपत्रक हे दि. ३० डिसेंबरला अधिसभेसमोर सादर होणार आहे. हे अंदाजपत्रक, ताळेबंद सादर करण्यास मंजुरी दिली. अंदाजपत्रक आणि त्यातील विविध तरतुदींबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.

Web Title: Extension of three months to various 78 contract professors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.