प्रवेश नोंदणीसाठी सीईटी सेलकडून मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:38 IST2020-12-16T04:38:50+5:302020-12-16T04:38:50+5:30

सीईटी सेलने सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक निकाल जाहीर केले. प्रवेश केव्हा सुरू होणार आहेत, याच्या प्रतीक्षेत हजारो विद्यार्थी ...

Extension from CET cell for admission registration | प्रवेश नोंदणीसाठी सीईटी सेलकडून मुदतवाढ

प्रवेश नोंदणीसाठी सीईटी सेलकडून मुदतवाढ

सीईटी सेलने सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक निकाल जाहीर केले. प्रवेश केव्हा सुरू होणार आहेत, याच्या प्रतीक्षेत हजारो विद्यार्थी व पालक होते. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावरून उपलब्ध करण्यात आले आहेत. कोरोनाचा काळ आणि प्रवेशाला उशिरा सुरुवात म्हणून कॅप राउंड यंदा कमी केले होते. त्याच दृष्टीने प्रवेश नोंदणीचा काळही कमी करण्यात आला होता. यामुळे आता मुदतीत वाढ केली आहे.

अर्ज करण्यासाठीच्या मुदतीची माहिती

अभ्यासक्रम मुदत

बी. आर्च., एम.बी.ए./एम.एम.एस. - २० डिसेंबर

बी. फार्मसी / डी. फार्मसी - २१ डिसेंबर

डीएसई., डीएसपी - २१ डिसेंबर

बी.ई. / टेक. - २२ डिसेंबर

बी.एच.एम.सी.टी. - २३ डिसेंबर

एम.सी.ए., एम. फार्मा., एम.आर्च. - २३ डिसेंबर

एम.ई./एम.टेक. - २४ डिसेंबर

Web Title: Extension from CET cell for admission registration