प्रॅक्टिसचा भर ‘स्टॅमिना’ वाढविण्यावर
By Admin | Updated: November 10, 2014 00:45 IST2014-11-10T00:24:34+5:302014-11-10T00:45:23+5:30
‘असा खेळ, अशी रणनीती’ : प्रथमच कोल्हापूरबाहेरील खेळाडूंना खेळविले.

प्रॅक्टिसचा भर ‘स्टॅमिना’ वाढविण्यावर
सचिन भोसले- कोल्हापूर -‘कोल्हापूरचा रांगडा खेळ’ असणाऱ्या फुटबॉलच्या पंढरीत यंदा सोळा संघांनी वरिष्ठ गट ‘ए’ डिव्हीजनकरिता मागील वर्षीच्या चांगल्या कामगिरीवर यंदा सहभाग घेतला आहे. यामध्ये प्रॅक्टिस क्लब (अ) व (ब) या संघांचाही समावेश आहे. या संघांनी आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत यंदाच्या फुटबॉल हंगामात जास्तीत जास्त विजेतेपद खेचून आणण्यासाठी आपल्या खेळाच्या डावपेचांत खेळाडूंचा ‘स्टॅमिना’ वाढविण्याबरोबर कोल्हापूरबाहेरील खेळाडूंनाही संघात प्रथमच स्थान दिले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात प्रॅक्टिस क्लबच्या दोन्ही संघांची रणनीती काय असणार आहे, याबद्दल सर्वसामान्य फुटबॉलशौकिनांना उत्सुकता लागून राहिली आहे.
यंदा प्रथमच प्रॅक्टिस क्लबने कोल्हापूरबाहेरील खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले आहे. यामध्ये अविनाश शेट्टी (डेक्कन पुणेचा खेळाडू, मूळ मिरज), अभिषेक बाबर (डेक्कन पुणे, मूळचा मिरज) यांचा समावेश आहे. हंगामात लीगसह सर्व स्पर्धांचे विजेतेपद आपल्याकडेच राहावे यासाठी क्लबच्या व्यवस्थापनाने प्रत्येक खेळाडूचा ४०-४० मिनिटांच्या खेळाच्या सामन्यात ‘स्टॅमिना’ राखून ठेवण्यासाठी किमान १२० मिनिटे खेळाडू विना दमता खेळत राहील, अशी व्यूहरचना आणि सराव घेण्यात येत आहे. कॉर्नर किक, फ्री कीक याकरिता विशेष शूटिंगचा सरावही २२ खेळाडूंकडून करून घेतला आहे. यासाठी रवी शेळके, संतोष महाडिक, प्रताप जाधव, राजू वायचळ हे परिश्रम घेत आहेत.
संघाची शान
१९२७ मध्ये स्थापन झालेल्या सुबराव गवळी तालमीच्या प्रॅक्टिस क्लबमुळे कैलास पाटील (ओएनजीसी स्ट्रायकर), सागर चिले (एअर इंडिया) हे ड्युरंडसह, आयलीग, फुटबॉल लीग या देशातील महत्त्वाच्या स्पर्धा गाजवीत आहेत, तर गोविंद जठार, विश्वास कांबळे (युनियन बँक), प्रकाश रेडेकर (गोलरक्षक), शरद मंडलिक, बाजीराव मंडलिक, अप्पा सूर्यवंशी, यशवंत सूर्यवंशी, यशवंत सरनाईक, पांडू पोपले, गोपी मुळीक, बाळू ढेरे, राम घोरपडे, बाळासाहेब पाटील (गोलरक्षक) आदींनी स्थानिकसह देशातील नामवंत स्पर्धा गाजविल्या आहेत
गेल्या चौदा वर्षांतील प्रॅक्टिस क्लबची कामगिरी
२०००-२००१प्रॅक्टिस क्लब (उपविजेतेपद)
२००४-२००५प्रॅक्टिस क्लब (विजेतेपद) २०१०-२०११(उपविजेतेपद) प्रॅक्टिस क्लब
स्टार खेळाडू
सध्या संघात ‘दिलबहार’कडून विनायक पाटील, सुशील सावंत,
‘पीटीएम’कडून ओंकार पाटील, हृषीकेश जठार, सुमित घाडगे हे स्टार खेळाडू आहेत.
कोल्हापुरातील खेळाडूंमध्ये अधिक टॅलेंट आहे; मात्र स्टॅमिनाची कमतरता असल्याने पुणे, मुंबईच्या स्पर्धक खेळाडूंबरोबरच्या सामन्यात त्यांचा निभाव लागत नाही. खेळात सराव हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपली मुले यात कमी पडतात. हाच मुद्दा घेऊन यंदा आमच्या संघातील मुले १२० मिनिटांपर्यंत कशी खेळतील व आपला स्टॅमिना कसा राखून ठेवतील याकडे लक्ष दिले आहे. याशिवाय आलेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर कसे करतील यावर भर म्हणून कॉर्नर किक, शूटिंगवर भर दिला आहे. कोल्हापूरच्या बाहेर ज्या मुलांना संधी आली त्यांनी पुन्हा स्थानिक स्पर्धेत खेळू नये कारण मुंबई, कोलकाता येथे विविध कॉर्पोरेट खेळाडूंना घडवितात. त्यामुळे प्रशिक्षकांनीही या कोल्हापूरबाहेर गेलेल्या खेळाडूंना बोलवू नये.
- विश्वास कांबळे, मुख्य प्रशिक्षक, प्रॅक्टिस क्लब
तयारी नव्या हंगामाची
गेल्या चौदा वर्षांतील प्रॅक्टिस क्लबची कामगिरी
२०००-२००१प्रॅक्टिस क्लब (उपविजेतेपद)
२००४-२००५प्रॅक्टिस क्लब (विजेतेपद) २०१०-२०११(उपविजेतेपद) प्रॅक्टिस क्लब