शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

एकदा कोल्हापूरची हद्दवाढ कराच.. अजितदादांची मुख्यमंत्र्यांसमोर विनंती

By भारत चव्हाण | Updated: November 6, 2025 18:00 IST

हद्दवाढीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत

भारत चव्हाणकोल्हापूर : अनेक वर्षांपासून रखडलेली शहराची हद्दवाढ करा म्हणून कोल्हापूरकर सातत्याने मागणी करत आहेत; पण आजपर्यंत काेणत्याच सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. सरकारमधील मंत्र्यांनी अनेकवेळा केवळ आश्वासने देऊन बोळवणच केली. बुधवारी कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘कोल्हापूरची हद्दवाढ करा ना, भावी पिढीचा विचार करा,’ असे सांगत विनंती करावी लागली.

कोल्हापुरातील कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘सगळे व्यासपीठावर बसलेत. माझी सर्वांना विनंती आहे. एकदा कोल्हापूरची हद्दवाढ करा ना, भावी पिढीचा कधी तरी विचार करा,’ असे सांगत शहराच्या हद्दवाढीचा विषय उपस्थित केला. असा वारंवार विषय उपस्थित करून हा प्रश्न सुटणारा नाही. त्यांनी स्वत: पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची हद्दवाढ राजकीय इच्छाशक्ती वापरून केली. कोल्हापूरच्या सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित करून ते हा निर्णय घेऊ शकतात. परंतु तसे न करता ते हद्दवाढ करा की हो, यातच अडकले आहेत.

कोल्हापूर शहरवासीयांनी हद्दवाढीच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू आहेत. प्रत्येक सरकारकडे ही मागणी झाली आहे; पण अद्यापही कोणी त्याची दखल घेतलेली नाही. उलट दुसरीकडे विरोध असल्याने या मागणीकडेच दुर्लक्ष केले आहे. अजित पवार यांनी मागे एकदा १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या कार्यक्रमात हद्दवाढीचा मुद्दा उचलून धरला. हद्दवाढ करावीच लागेल, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर ‘सरकार आपल्या दारी’ या कार्यक्रमातदेखील त्यांनी हा विषय उपस्थित करून सरकार त्यावर योग्य निर्णय घेईल, असे सांगितले होते.परंतु पवार यांनाही अजूनपर्यंत शक्य झालेले नाही. पवार यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचा हद्दवाढीला विरोध आहे का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. खरतर हद्दवाढीचा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा आहे, तशी विनंती करण्याचाही प्रश्न येत नाही. तरीही पवारांनी विनंती केली.

एकाने हसायचे एकाने रडायचेहद्दवाढ करण्याचे आमच्या हातात नाही, सरकारने करायची आहे. मात्र ‘एकाने हसायचे आणि एकाने रडायचे’ असा खेळ सुरू आहे. निर्णय घेत असताना पलीकडच्या लोकांचे ऐकायला पाहिजे, असा काही नियम, कायदा नाही. हद्दवाढीचा विषय हा राजकीय नाही तर भौगोलिकदृष्ट्या जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा आहे, असे ॲड. बाबा इंदूलकर यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Dada requests CM for Kolhapur's boundary expansion.

Web Summary : Ajit Pawar urged Maharashtra's CM to expand Kolhapur's boundaries for future generations. Despite repeated requests, previous governments haven't acted. Kolhapur citizens have long protested for this expansion, which Pawar supports.