विनाअनुदानित महाविद्यालयांचा संलग्नीकरण कालावधी तीन वर्षांपर्यंत वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:22 IST2021-01-22T04:22:44+5:302021-01-22T04:22:44+5:30
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ विकास आघाडीचे प्रमुख डॉ. संजय डी. ...

विनाअनुदानित महाविद्यालयांचा संलग्नीकरण कालावधी तीन वर्षांपर्यंत वाढवा
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठ विकास आघाडीचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील होते. बैठकीत संस्थाचालक सचिन सूर्यवंशी, सुभाष कुलकर्णी, ॲड. विजय पाटील, आर. एन. येजरे, आदींनी विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्रश्न मांडले. कोरोनामुळे विनाअनुदानित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी अद्याप शुल्क भरले नसल्याने या महाविद्यालयांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी किमान तीन वर्षे लागणार असल्याने विद्यापीठाशी संलग्न सर्व विनाअनुदानित महाविद्यालयांचा संलग्नता कालावधी पुढील तीन वर्षांसाठी वाढवावा. यासह अन्य मागण्यांबाबत कुलगुरू डॉ. शिर्के यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शिक्षण संचालक गुप्ता यांची आघाडी शिष्टमंडळासमवेत भेट घेऊन विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांसंबंधी चर्चा करण्यात येईल. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यामार्फतही प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. संजय डी. पाटील यांनी सांगितले. प्राचार्य क्रांतीकुमार पाटील, भैय्या माने यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस सुनीता भोसले, शुभदा माने, मानसी जाधव, भागवत लोखंडे, जयदीप पाटील, आदी उपस्थित होते. व्ही. एम. पाटील यांनी आभार मानले.
कोण, काय, म्हणाले?
एन. डी. चौगुले : ‘नॅक’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले प्राचार्य, ग्रंथपाल, फिजिकल डायरेक्टर या पदासाठीचे उमेदवार कमी पगारामुळे विनाअनुदानित महाविद्यालयांना मिळत नाही.
धैर्यशील पाटील : ६० वर्षांपुढील व अनुदानित महाविद्यालयांतून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी घेता येतील का? याची चाचपणी करावी.
चौकट
सर्व प्रश्नांचा गांभीर्याने विचार
या मागण्यांचे निवेदन विकास आघाडीने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले. त्यावर सर्व मागण्या, प्रश्नांचा गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
फोटो (२१०१२०२१-कोल-विद्यापीठ विकास आघाडी) : कोल्हापुरात मंगळवारी विनाअनुदानित महाविद्यालयांच्या संस्थाचालकांच्यावतीने सचिन सूर्यवंशी, एन. डी. चौगुले, मारुतराव परितकर यांनी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी डावीकडून व्ही. एम. पाटील, धैर्यशील पाटील, क्रांतिकुमार पाटील, भैय्या माने उपस्थित होते.