शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

स्थायी समिती सभेतून आरोग्य अधिकाऱ्यांची हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 18:28 IST

कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांची सोमवारी स्थायी समिती सभेतून हकालपट्टी करण्यात आली. शहरातील कोरोनामुळे उपचारांविना अनेकांचा मृत्यू होत आहे.

ठळक मुद्देस्थायी समिती सभेतून आरोग्य अधिकाऱ्यांची हकालपट्टी उद्धट उत्तर दिल्याचा सदस्यांचा आरोप

कोल्हापूर : महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांची सोमवारी स्थायी समिती सभेतून हकालपट्टी करण्यात आली. शहरातील कोरोनामुळे उपचारांविना अनेकांचा मृत्यू होत आहे.

प्रशासन म्हणून खासगी रुग्णालयांवर वचक ठेवला गेला नाही. नागरिकांसमोर कोरोना उपचाराबाबत जनजागृती करण्यात प्रशासन कमी पडले, असे आरोप स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली.

मला कामाची गरज नाही. माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी महापालिकेत आतापर्यंत थांबलो आहे, ही माहिती वॉररूममध्ये मिळेल, अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे सर्व सदस्य आक्रमक झाले.स्थायी समिती सभापती संदीप कवाळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची सभा झाली. यावेळी सर्व सदस्यांनी शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात प्रशासनासमोर प्रश्न उपस्थित केले.

नागरिक व्हेंटिलेटर असणाऱ्या हॉस्पिटलमध्येच जाण्यासाठी धावाधाव करतात. त्यामध्ये त्यांचा बराच वेळ जातो. काही लोकांना यामुळे प्राण गमवावे लागले. यासंदर्भात आरोग्य विभाग म्हणून तुमची काही जबाबदारी आहे का नाही. नागरिकांना कोरोना संदर्भातील जनजागृती करणे गरजेचे आहे, असे गटनेते शारंग देशमुख यांनी सांगितले.यावर आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही. मला कामाची गरज नाही, असे शब्द वापरले. यावर गटनेते देशमुख, सदस्य अजित राऊत, नियाज खान यांनी डॉ. पाटील यांची चांगलीच खरडपट्टी केली.

तुम्ही स्थायी समिती सभागृहाचा अपमान केला आहे. सभागृहात थांबू नका बाहेर व्हा, अशा शब्दांत सुनावले. आक्रमक झालेल्या सदस्यांनी त्यांना सभागृहातून बाहेर काढले. डॉ. पाटील गेल्या काही दिवसांपासून राजीनाम्याच्या पवित्र्यामध्ये आहेत. याचबरोबर त्यांची आरोग्य अधिकारी पदाची वर्षाची मुदतही संपण्याच्या मार्गावर आहे. यादरम्यानच असा प्रकार घडला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका