शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

व्यक्त झाले अबोल प्रेम!

By admin | Updated: February 15, 2017 00:58 IST

व्हॅलेंटाईन डे : तरुणाईत उत्साह; सामाजिक कार्याचीही झालर

कोल्हापूर : आपल्या अबोल प्रेमाला साद घालत मंगळवारी तरुणाईने ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या जल्लोषात साजरा केला. शहरातील राजारामपुरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्कसह विविध हॉटेल्समध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ची धूम दिसून आली. या दिवसाला विधायकतेची झालर देत अनेक व्यक्ती व संस्थांनी रक्तदान शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमांसह वंचित घटकाला आनंद देण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे ‘प्रेमाचा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. संत व्हॅलेंटाईन यांच्या नावाने सुरू झालेला हा ‘डे’ सुरुवातीला सर्वांच्याच टीकेचे लक्ष्य ठरला. आता मात्र भारतीयांकडून हा दिवस आपलासा करीत उत्साहात साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस तरुणांत केवळ ‘प्रपोज’ करण्यासाठीच साजरा केला जायचा. आता ही चौकट मोडून प्रेमाच्या अर्थाची परिभाषा बदलली आहे. आई-वडील, पती-पत्नी, भावा-बहिणीचे प्रेम, महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींचा कट्टा, ज्येष्ठांचा मायेचा हात या प्रेमाच्या सगळ्या अंगांना स्पर्श करीत हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त मंगळवारी सकाळपासून सर्व महाविद्यालयांवर तरुणाईची गर्दी होती. खास वेशभूषा करून युवक-युवती महाविद्यालयात हजर होते. काही हॉटेल्स्, रेस्टॉरंट सजविण्यात आली होती. शुभेच्छापत्र, गिफ्टची देवाण-घेवाण होत होती. पोलिसांची कारवाई ‘व्हॅलेंटाईन डे’ला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही विशेष खबरदारी घेतली होती. संवेदनशील असलेल्या महत्त्वाच्या महाविद्यालयांवर पोलिसांचा पहारा होता. पोलिस महाविद्यालयाच्या बाहेर कोणालाही थांबू देत नव्हते. मुलांना घोळका करून थांबण्यास मज्जाव करण्यात आला होता शिवाय महाविद्यालयाचे वॉचमन जातीने परिसरात उपस्थित राहून कुठे अनुचित प्रकार घडत नाही, याकडे लक्ष देत होते. सामाजिकतेची झालर या दिवसाला सामाजिकतेची झालर देत कृती समिती संयुक्त न्यू शाहूपुरी या संस्थेच्यावतीने ताराबाई गार्डन येथे रक्तदान शिबिर झाले. अध्यक्ष संजय घाटगे-वंदूरकर व ए. बी. फौंडेशनचे संचालक प्रदीप अतिग्रे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम झाला. तसेच सार्थक क्रिएशनच्या विद्यार्थ्यांनी शिये येथील करूणालय मुलांसोबत दिवस घालवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलविले.