एक्स्प्रेस गाड्यांना गांधीनगर - वळीवडे रेल्वे स्टेशनवर थांबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST2021-02-05T07:06:37+5:302021-02-05T07:06:37+5:30

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. या बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल दररोज होत असते. या बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रासह ...

Express trains stop at Gandhinagar-Waliwade railway station | एक्स्प्रेस गाड्यांना गांधीनगर - वळीवडे रेल्वे स्टेशनवर थांबा द्या

एक्स्प्रेस गाड्यांना गांधीनगर - वळीवडे रेल्वे स्टेशनवर थांबा द्या

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. या बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल दररोज होत असते. या बाजारपेठेमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यांतून ग्राहक वर्ग ये-जा करत असतो. पण रेल्वेच्या एक्स्प्रेस गाड्या या स्टेशनवर थांबत नाहीत. त्यामुळे गांधीनगरला थांबू इच्छिणाऱ्या व्यापारी-प्रवाशांना पुढच्या स्टेशनवर जाऊन परत माघारी यावे लागते. यात वेळेचा अपव्यय होत असल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे गांधीनगर-वळीवडे स्टेशनवर एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी सतीश माळगे, सलमान मौलवी, प्रवीण निगवेकर, स्वप्नील चव्हाण, रूपेश कदम, अभिजित कांबळे, साताप्पा कांबळे, शुभम कांबळे उपस्थित होते.

फोटो : ०३ गांधीनगर निवेदन

ओळ- गांधीनगर-वळीवडे रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने कोल्हापूर रेल्वेचे स्टेशनमास्तर यांच्याकडे केली.

Web Title: Express trains stop at Gandhinagar-Waliwade railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.