शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नव्या हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 07:10 IST

उसाला प्रतिटन १४० रुपये अनुदानाचा प्रस्ताव

-चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : एक आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर हंगामात ५० लाख टन साखर निर्यात करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अन्न मंत्रालयाने तयार केला आहे. यासाठी कारखान्यांना गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन १४० रुपये अनुदान तसेच निर्यात केल्या जाणाºया साखरेला प्रतिटन अडीच ते तीन हजार रुपये वाहतूक अनुदान देण्याचा प्रस्तावही तयार केला आहे. हे दोन्ही प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर येण्याची शक्यता आहे.अतिरिक्त साखर उत्पादनामुळे देशातील घसरलेले साखरेचे दर वधारावेत व अडचणीतील साखर उद्योगाला मदत व्हावी या उद्देशाने हे प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. किनारपट्टी जवळ असलेल्या भागात अडीच हजार रुपये, तर अन्यत्र तीन हजार रुपये प्रतिटन वाहतूक अनुदान दिले जाण्याची शक्यता आहे. मंत्रालयाने या संदर्भातील प्रस्तावाच्या मसुद्यावर अन्य मंत्रालयांचे मत मागविले आहे. पुढील आठवड्यापर्यंत ते मिळेल अशी अपेक्षा आहे. त्यानंतरच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल, असेही या सूत्रांनी सांगितले.निर्यातीशिवाय पर्याय नाहीसाखरेच्या निर्यातीवर अनुदान देण्याच्या भारताच्या निर्णयाविरुद्ध ब्राझील आणि आस्ट्रेलिया या दोन देशांनी जागतिक व्यापार संघटनेकडे अधिकृतपणे तक्रार दाखल केली असली, तरी तिच्याकडे दुर्लक्ष करून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. कारण देशात गरजेपेक्षा जादा साखरेचे उत्पादन यंदा झाले आहे. नव्या हंगामातही साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असल्याने अनुदान देऊन साखर निर्यात करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगण्यात येते....म्हणून अनुदानात वाढ२०१७-१८ च्या साखर हंगामात केंद्र सरकारने २० लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य ठेवले होते. यासाठी देशातील ५२८ साखर कारखान्यांना निर्यात कोटा ठरवून दिला होता. हा कोटा पूर्ण करणाऱ्या कारखान्यांच्या ऊस उत्पादकांना प्रतिटन ५५ रुपये अनुदान जाहीर केले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही दर घसरलेले असल्याने आतापर्यंत केवळ पाच लाख टन साखरेचीच निर्यात होऊ शकली आहे. यामुळेच नव्या हंगामात अनुदानात भरीव वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे समजते.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने