राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांचे शोषण : शेट्टी

By Admin | Updated: August 24, 2014 22:34 IST2014-08-24T22:05:41+5:302014-08-24T22:34:48+5:30

आमचा विरोध हा सहकारातील भ्रष्टाचाराला असून, त्याला खतपाणी घालणाऱ्या या राजकारण्यांना आहे.

Exploit of farmers from the rulers: Shetty | राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांचे शोषण : शेट्टी

राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांचे शोषण : शेट्टी

वाघापूर : शेतकऱ्यांच्या मालाला हक्काचा भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे शोषण केले जात आहे. असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते वाघापूर (ता. भुदरगड) येथे ग्रामपंचायत व सर्वपक्षीयांच्या वतीने आयोजित सत्कारप्रसंगी बोलत होते.
शेट्टी म्हणाले, शेतकरी चळवळ जिवंत राहिली पाहिजे, यासाठी सहकार मोडता कामा नये. तो वाचला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. यासाठी पुणे येथे आम्ही सहकार बचाव परिषद घेतली. आमचा विरोध हा सहकारातील भ्रष्टाचाराला असून, त्याला खतपाणी घालणाऱ्या या राजकारण्यांना आहे.
जिल्हाध्यक्ष जालंदर पाटील म्हणाले, या मतदारसंघात २६६ कोटींची विकासकामे केल्याचे डिजिटल बोर्ड लावणारे विद्यमान आमदार यांनी तालुक्यातील रस्त्यांची पाहणी करावी, म्हणजे खरा विकास कोणाचा झाला, हे कळेल.
यावेळी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार सरपंच साताप्पा जठार, देवस्थानतर्फे रावजी बरकाळे, ‘स्वाभिमानी’चे शाखाध्यक्ष तानाजीराव पाटील, अनिल कामिरकर, अरविंद जठार, संजय दाभोळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ‘स्वाभिमानी’चे भुदरगड तालुकाध्यक्ष नितीन पोवार, राधानगरी तालुकाध्यक्ष मालोजी जाधव, कागल तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, डॉ. आडदांडे, सरपंच साताप्पा जठार, उपसरपंच अशोक कांबळे, काँग्रेस युवा नेते सचिनदादा घोरपडे, देवस्थानचे अरविंद जठार, रावजी बरकाळे, शिवाजी गुरव, तानाजी पाटील, धोंडिराम बरकाळे, बाळासाहेब दाभोळे, जोतिराम दाभोळे, दादासो दाभोळे, संदीप बरकाळे, तानाजी भोई, प्रकाश जठार-नाईक, आदी उपस्थित होते. अर्जुन दाभोळे यांनी सूत्रसंचालन केले.एकनाथ जठार यांनी प्रास्ताविक मानले. शिवप्रसाद गुरव यांनी आभार मानले.

Web Title: Exploit of farmers from the rulers: Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.