ऊसतोडणी मजुरांचा शेतकऱ्यांना जाच
By Admin | Updated: November 21, 2015 00:15 IST2015-11-20T20:42:22+5:302015-11-21T00:15:21+5:30
टनाला ५0 ते १०० रूपयांचा फटका : प्रत्येक गाडी, ट्रॅक्टरमागे खुशालीची मागणी

ऊसतोडणी मजुरांचा शेतकऱ्यांना जाच
चंद्रकांत पाटील -- गगनबावडा : गेल्या काही वर्षापासून ऊसतोडणी मजुरांना प्रत्येक गाडीमागे पैसे देण्याचा एक नवीनच पायंडा पडला आहे. लाच घेतल्याशिवाय ते फडाला हात लावत नाहीत. हे कारखान्याला माहीत असूनही ते संबंधितांवर कारवाई करीत नाहीत. त्यामुळे या मजुरांचे फावले आहे. लाच दिल्याने शेतकऱ्यांना सरासरी टनाला ५० ते १०० रूपयांचा फटाक बसतो.
गळीत हंगाम सुरू झाला की सुरूवातीचे काही दिवस पैस न घेता मजुर तोडणी करतात नंतर मात्र ट्रक व ट्रॅक्टरला ५०० ते १००० रू असा लाचेचा दर पाडतात. शेतकरी ऊसाला तोडणी आल्यावर पैसे देण्यास नकार देवू लागला तर सरळ ऊस न तोडण्याची धमकी देतात. त्यामुळे हाता पाया पडून आणलेली तोडणी परत जाऊ नये म्हणून शेतकरी नाईलाजास्तव पैसे द्यायला तयार होतात. काही मोठ्या शेतकऱ्यांना पैसे देण्यास जरी परवडत असले तरी लहान शेतकऱ्यांना म्हणजे दहा गुंठे, अर्धा एकर किंवा एकरभर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला पैसे देणे परवडत नाही.
तोडणीसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई म्हणून कारखाना व्यवस्थापनाला शेतकरी संघटनेने जाब विचारावा, अशी मागणी होत आहे. तसेच कारखान्यानेही याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी होत आहे.
मुबलक पाऊस : तरीही दुष्काळ
कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रात सधन समजला जातो. मात्र, त्याच जिल्ह्यातील एका भागात मुबलक पाऊस पडूनही वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याचे विरोधाभासाचे चित्र पहावयास मिळत आहे.
४साठवण प्रकल्प नसल्याने धामणी खोऱ्यातील शेतकरी आपल्या जिवावर उदार होऊन स्वखर्चाने बंधारे बांधून पाणी अडवून आपली शेती जगवितो व आपणही जगतो आहे.
४दरवर्षी लाखो रुपयांचा भुर्दंड थांबविण्यासाठी या परिसरास वरदान ठरणाऱ्या धामणी प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
माझ्या आजोबा वडील यांच्या काळापासुनच धामणी नदीवर बंधारा बांधुन पाणी अडवण्याविषयी मी ऐकुन होतो. त्यांच्याप्रमाणेच मी शेती करायला लागल्यापासुन मीही मातीचा बंधारा बांधुन त्यातील पाण्यावरच शेती जगवत आहे. अन्य पर्याय नसल्याने मातीचे बंधारे बांधण्याशिवाय पर्याय नाही. बंधारे बांधले तरच या परिसरातील शेतकरी जगणार आहे. आतातरी सरकारने लक्ष द्यावे.
- महिपती शंकर चौधरी, चौधधरवाडी, ता. गगनबावडा.
माझे वय ८५ वर्षांच्या पुढे असुन माझ्या लहानपणापासुन अशा प्रकारे मातीचे बंधारे नदीवर बांधुन पुर्ण अडविण्याची प्रथा आहे. आमची हयात बंधारे बांधण्यात संपली. आतातरी सरकारने आमची पाण्याची सोय करून पुढच्या पिढीला या चक्रव्युहातून सोडवाव.
- भाऊ बाळा पाटील, म्हासुर्ली, लाभधारक शेतकरी