ट्रेलर पासिंगसाठी वर्षाची मुदतवाढ

By Admin | Updated: April 9, 2016 00:10 IST2016-04-08T23:52:39+5:302016-04-09T00:10:29+5:30

आदेश उद्योजकांकडे सुपूर्द : ट्रेलर उद्योगाला नवसंजीवनी मिळणार

Expansion of the year for trailer passage | ट्रेलर पासिंगसाठी वर्षाची मुदतवाढ

ट्रेलर पासिंगसाठी वर्षाची मुदतवाढ

सतीश पाटील --शिरोली -पश्चिम महाराष्ट्रातील मोजक्याच उद्योजकांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा ट्रेलर पासिंगला एक वर्षाची मुदत वाढवून दिली. तसा अध्यादेश सचिव अभय दामले यांनी उद्योजकांकडे सुपूर्द केला आहे, त्यामुळे ट्रेलर उद्योगाला आणि शेतकऱ्यांंना नवसंजीवनी मिळाली आहे.
ट्रेलरचे पासिंग पूर्ववत करावे यासाठी ट्रेलर, उद्योजक आणि अ‍ॅग्रिकल्चरल असोसिएशन (आयमा)चे अध्यक्ष कृष्णात पाटील, संपर्कप्रमुख युवराज चौगुले, सचिव व्यंकटराव मोरे यांनी गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन पासिंंग सुरू करण्याबाबत आदेश घेऊन आले.
बैठकीत ब्रेक यंत्रणा लावली पाहिजे, असा नियम केंद्रीय परिवहन विभागाच्यावतीने २00८ साली काढला आहे, पण गेली आठ वर्षे ट्रेलरचे पासिंग केंद्रीय मंत्र्यांकडून उद्योजक चालू करून आणतात. सध्या ट्रेलरचे पासिंग फेब्रुवारीत बंद झाले होते व ब्रेक यंत्रणा लावण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, पण ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बसविली, तर ट्रेलरची किंमत साठ हजारांनी वाढणार आहे. तसेच वाढती महागाई, राज्यात पडलेला दुष्काळ आणि मंदीमुळे उद्योग अगोदरच अडचणीत आले आहेत. त्यात पासिंग बंद केले, तर ट्रेलर उद्योग नाहीसे होतील. तसेच ट्रॅक्टरला अजून ब्रेक सप्लाय पॉर्इंट काढलेला नाही आणि नवीन ट्रॅक्टरना ब्रेक सप्लाय पॉर्इंट काढला, तर ती यंत्रणा जाणून घेण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे म्हणून ट्रेलरचे पासिंंग पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी उद्योजकांनी केली.
ट्रॅक्टर कंपन्यांनी अजून ब्रेक सप्लाय पॉर्इंट काढलेला नाही व मग ट्रेलर पासिंंग बंद करून राज्यातील पाच हजार उद्योजकांचा तोटा होत आहे. दोन महिने ट्रेलर पासिंंग बंद केल्याने बरेच ट्रेलर उद्योग बंद आहेत. लाखो कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. यावर मंत्री गडकरी यांनी अभय दामले यांना एक वर्षासाठी ट्रेलर पासिंंग तत्काळ सुरू करा आणि तसा लेखी अध्यादेश उद्योजकांना द्या, असे सांगितले.

ट्रेलर पासिंग मुदतवाढ मिळाली आहे, पण यामध्ये अ‍ॅग्रिकल्चरल असोसिएशन आॅफ इंडिया (आयमा) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांंच्या प्रयत्नाने हे पासिंंग सुरू झाले आहे. राज्यात सुमारे पाच हजार ट्रेलर उद्योग आहेत आणि असोसिएशनमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा येथील फक्त शंभर उद्योजक सभासद आहेत. यातील निवडक उद्योजक दिल्लीला जाऊन पासिंग सुरू करून आणतात. इतर उद्योगांनी यात सहभागी होणे गरजेचे आहे.
- कृष्णात पाटील,
अध्यक्ष, आयमा

Web Title: Expansion of the year for trailer passage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.