राजे फाउंडेशनच्या कोविड केअर सेंटरचे विस्तारीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST2021-05-20T04:24:50+5:302021-05-20T04:24:50+5:30
शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर पंचवीस बेडचे कोविड केअर सेंटर काही दिवसांपूर्वी सुरू केले होते. हे सर्व बेड फुल्ल ...

राजे फाउंडेशनच्या कोविड केअर सेंटरचे विस्तारीकरण
शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर पंचवीस बेडचे कोविड केअर सेंटर काही दिवसांपूर्वी सुरू केले होते. हे सर्व बेड फुल्ल झाले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडसाठी वारंवार विचारणा होत आहे. त्यामुळे आणखी पंचवीस बेड वाढविण्यात आले. दहा ऑक्सिजन बेडसह पन्नास बेड आहेत. एक ऑक्सिजन काॅन्सट्रेटर उपलब्ध आहे. रुग्णांना सवलतीच्या दरात भोजन व्यवस्था केली आहे. आतापर्यंत पंधरा रुग्ण यशस्वी उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे कागल करवीर तालुक्यासह सीमा भागातील रुग्णांची सोय होणार आहे.
यावेळी कोविड केअर सेंटरचे डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. तुषार भोसले, डॉ महेंद्र पाटील, सैफ शेख, साहिल अन्सारी, शाहू साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील, यशवंत माने, सचिन मगदूम आदी उपस्थित होते.
छायाचित्र
कागल येथील राजे फाउंडेशनच्या विस्तारित कोविड केअर सेंटरचे उद्घाटन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्ष नवोदिता घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवराज पाटील, सचिन मगदूम आदी उपस्थित होते.