'युनाते क्रिएशन्स'चे बेंगलोरमध्ये चित्रप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:49 IST2021-09-02T04:49:14+5:302021-09-02T04:49:14+5:30

कोल्हापूर : ‘युनाते क्रिएशन’च्यावतीने ३ ते ६ सप्टेंबर या कालावधीत बेंगलोरमधील कर्नाटक चित्रकला परिषद आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात ...

Exhibition of 'Unate Creations' in Bangalore | 'युनाते क्रिएशन्स'चे बेंगलोरमध्ये चित्रप्रदर्शन

'युनाते क्रिएशन्स'चे बेंगलोरमध्ये चित्रप्रदर्शन

कोल्हापूर : ‘युनाते क्रिएशन’च्यावतीने ३ ते ६ सप्टेंबर या कालावधीत बेंगलोरमधील कर्नाटक चित्रकला परिषद आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रकार कृष्णा शेट्टी यांच्याहस्ते याचे उद्घाटन होणार आहे.

कोरोनामुळे 'ऑनलाईन चित्रप्रदर्शन' ही संकल्पना सुरू झाली असली, तरी एखादी कलाकृती प्रत्यक्ष बघून मिळणारा आत्मिक आनंद आणि निर्माण होणार रसास्वाद वेगळा असतो. म्हणूनच कोल्हापुरातील दळवीज् आर्ट इन्टिट्यूटचे माजी विद्यार्थी हे प्रदर्शन दरवर्षी भारताच्या मुख्य शहरांमध्ये आयोजित करत आहेत. त्यानुसार कोल्हापूर, मुंबई, नवी दिल्ली यानंतर आता बेंगलोरमध्ये चित्रे सादर करणार आहेत. यात प्रतीक्षा व्हनबट्टे, पुष्पक पांढरबळे, आकाश झेंडे, दुर्गा आजगावकर, शुभम चेचर यांचा सहभाग आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत कर्नाटक चित्रकला परिषद, बेंगलोर मध्ये खुले असेल.

---

फोटो नं ३१०८२०२१-कोल-चित्र

---

Web Title: Exhibition of 'Unate Creations' in Bangalore