माजी विद्यार्थिनींचा एकसष्टी सोहळा
By Admin | Updated: May 21, 2015 00:09 IST2015-05-20T21:34:14+5:302015-05-21T00:09:17+5:30
भावस्पर्शी कार्यक्रम : ‘एम.एल.जी.’च्या १९७१-७२ च्या जमल्या वर्गमैत्रिणी

माजी विद्यार्थिनींचा एकसष्टी सोहळा
कोल्हापूर : शिक्षणक्षेत्रात दबदबा असलेल्या महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल (एम. एल. जी.) च्या सन १९७१-७२च्या बॅचच्या देशभरातून एकत्रित येऊन ४५ विद्यार्थिनींनी आपला एकसष्टी सोहळा साजरा करताना आरोग्यमंत्राचे वस्तुपाठ घालून दिला.
येथील हॉटेल पॅव्हेलियनमध्ये झालेल्या या भावस्पर्शी स्नेहमेळाव्यात शालेय जीवनातील संस्कार आणि फुलपंखी दिवसांच्या आठवणीत सर्वजणी रंगून गेल्या होत्या. पूर्वीच्या वर्गमैत्रिणी आणि आज आजीबाई असलेल्या या मैत्रिणी एकमेकींची
खुशाली विचारण्यात मग्न झाल्या होत्या.
पुणे येथील ज्ञानप्रबोधिनीच्या श्रीमती चित्रा चंद्रचूड़ यांनी ‘आरोग्य उतारवय आणि प्रफुल्लित चित्तवृत्ती’ यावर मार्गदर्शन केले. रंजना इंग्रोळे, बीना कुलकर्णी, कला पाटील आदींच्या परिश्रम आणि नियोजनामुळे सोहळा यशस्वी झाला. (प्रतिनिधी)