शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Kolhapur: 'महावितरण'चा कार्यकारी अभियंता ३० हजाराची लाच घेताना अटकेत, त्रस्त मंडळींनी केली फटाक्यांची आतषबाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:22 IST

सदनिकेला वीज जोडणी देण्यासाठी मागितली लाच

इचलकरंजी : एका इमारतीमधील १८ सदनिकांना वीज जोडणी देण्यासाठी ९० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंद राठी (वय ४९, रा. उपकार रेसिडेन्सी, सांगली रोड. मूळ गाव अमरावती) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.ही कारवाई मंगळवारी दुपारी महावितरणच्या मुख्य कार्यालयात करण्यात आली. राठी सापडल्याचे समजताच काही त्रस्त मंडळींनी प्रवेशद्वारासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. दरम्यान, या कारवाईमुळे रक्तदाब वाढल्याने राठी याला आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.याबाबत लाचलुचपत विभागाकडून मिळालेली माहिती अशी, तक्रारदार हा इलेक्ट्रिक ठेकेदार असून, त्याने एका इमारतीमधील १८ सदनिकांमध्ये वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रे देऊन महावितरणकडे मागणी नोंदवली. हा अर्ज मंजूर करण्यासाठी तक्रारदार याने कार्यकारी अभियंता राठी याची भेट घेतली. त्यावेळी १८ सदनिकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे ९० हजार रुपये दिल्यास प्रकरण मंजूर होईल, असे सांगत राठी याने लाचेची मागणी केली.यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली असता त्यामध्ये राठी याने ९० हजार रुपयांच्या मागणीला दुजोरा देत तडजोडीअंती ३० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्याप्रमाणे पथकाने महावितरण कार्यालयात सापळा रचत मंगळवारी दुपारी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राठी याला ताब्यात घेतले. त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राठी याचा रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात दाखलदरम्यान, कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या राठी याचा रक्तदाब वाढल्याने त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक त्रास जाणवू लागल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तेथून कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या.यापूर्वीही पाचवेळा कारवाईमहावितरणमध्ये यापूर्वीही सुमारे पाचवेळा लाचलुचपत विभागाकडून कारवाई झाली आहे. अधिकारी, कर्मचारी, सरकारी ठेकेदार अशा सहाजणांना ताब्यात घेतले. तरीही महावितरणमधील भ्रष्ट कारभार सुरूच असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट झाले.घरांची झडतीराठी याच्यावर कारवाई केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्या अमरावती आणि इचलकरंजीतील दोन्ही घरांची झडती घेतली.

यांनी केली कारवाईपोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश भंडारे, विकास माने, संदीप काशिद, सचिन पाटील, उदय पाटील, गजानन कुऱ्हाडे, प्रशांत दावणे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीmahavitaranमहावितरणBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग