वीजबिल माफ करा, अन्यथा कोल्हापूर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:54+5:302021-02-16T04:24:54+5:30

कोल्हापूर : लॉकडाऊनमधील वीजबिल माफ करण्याची मागणी वारंवार करूनही महावितरण कंपनीकडून वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरूच ठेवली आहे. लोकभावना ...

Excuse the electricity bill, otherwise Kolhapur off | वीजबिल माफ करा, अन्यथा कोल्हापूर बंद

वीजबिल माफ करा, अन्यथा कोल्हापूर बंद

कोल्हापूर : लॉकडाऊनमधील वीजबिल माफ करण्याची मागणी वारंवार करूनही महावितरण कंपनीकडून वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरूच ठेवली आहे. लोकभावना विचारात घेऊन वीज माफ करावे, अन्यथा कोल्हापूर बंद असे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा कृती समितीच्यावतीने देण्यात आला. समितीची रविवारी तातडीची बैठक झाली.

लॉकडाऊनमधील सहा महिन्यांचे वीजबिल वसुली करू नये, अशी मागणी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. तरीही कर्मचारी थकबाकीच्या नावाखाली वीज कनेक्शन तोडण्याचा मनमानी कारभार करत आहेत. जनता याविरोधात स्वस्थ बसणार नाही. आंदोलनाची धग कायम ठेवू किंबहुना आंदोलन आणखी व्यापक केले जाईल, असा निर्णयही या बैठकीत झाला. यावेळी बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, सुभाष जाधव, निवास साळोखे, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Excuse the electricity bill, otherwise Kolhapur off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.