शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

Kolhapur: जिवावर बेतणारे सेल्फी, फोटोसेशनचा स्टंट; पन्हाळगडावर पर्यटकांचे धोकादायक प्रकार वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 15:59 IST

नितीन भगवान  पन्हाळा : दोन आठवड्यापुर्वी पन्हाळगडावर उंच कड्यावरुन एक तरुण सेल्फी घेताना पायघसरुन खाली पडल्याची घटना समोर आली. ...

नितीन भगवान पन्हाळा : दोन आठवड्यापुर्वी पन्हाळगडावर उंच कड्यावरुन एक तरुण सेल्फी घेताना पायघसरुन खाली पडल्याची घटना समोर आली. सुदैवाने हा तरुण बचावला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे सेल्फीचा मोह या तरुणाला महागात पडला त्याला जीवाला मुकण्याची वेळ आली होती. पन्हाळगडावरील तटबंदी, कड्यालगत उभे राहुन जीव धोक्यात घालत फोटोसेशन, सेल्फी करण्याची स्टंटबाजी जीवघेणी ठरत आहेत.उन्हाळा, हिवाळा व पावसाळा पन्हाळ्यातील  वातावरण आल्हाददायक असते. यामुळे पन्हाळगडावर कायमच पर्यटकांची गर्दी असते. शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी तर गडावर पर्यटकांची रीघ असते. निसर्गाच्या सानिध्यात जात असताना त्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी प्रत्येकजण आतुरलेला असतो. मात्र या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने जीवावर बेतणारे प्रसंगही घडत आहेत. त्यामुळे भान हरपून निसर्ग कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात अनेकांना जीवाला मुकण्याची वेळ आल्यावरच शहाणपणा येणार काय असा प्रश्न आहे.विविध पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्टंटबाजी केल्याने अनेक युवकांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना समोर येत आहेत. पन्हाळ्यावर सध्या पावसाला सुरुवात झाल्याने येथील घनदाट धुके, थंडगार वारा आणि पावसाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. धोकादायक ठिकाणी बेभान होऊन थ्रील करत सेल्फी करण्यात तरुण मग्न होत आहेत. अंधारबाव ते तीनदरवाजा दरम्यान असलेल्या कठड्यावर उभे राहुन तरुणाई आपल्या मित्रासमवेत सेल्फी, फोटोसेशन करताना करत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे निसर्ग कॅमेऱ्यात कैद करताना स्टंटबाजीमुळे दवाखान्याची पायरी चढु नका असे आवाहन पन्हाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे व नगरपरिषद मुख्याधिकारी चेतन कुमार माळी यांनी केले आहे. पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे पन्हाळ्यासह परिसरातील मसाईपठार येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. येथील तटबंदीवर दरीच्या बाजुने सेल्फी, फोटोसेशन करणे धोकादायक असुन संरक्षणासाठी तेथे कठडे नाहीत, पावसामुळे प्रचंड निसरडे झाले आहे. पण पर्यटक कोणतीही काळजी घेत नाहीत. याठिकाणी लोकवस्ती नसल्याने अपघात की घातपात असाच समज होणार आहे. त्यामुळे स्टंटबाजी करताना पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसtourismपर्यटन