शाहू साखर कारखान्याचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:05+5:302021-02-23T04:36:05+5:30

राज्यस्तरीय सोयाबीन व भात पीक स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते अनुक्रमे मधुकर तेलवेकर व मलगोंडा कतगर यांचा सत्कार केला. यावेळी ...

Excitement of Shahu Sugar Factory anniversary | शाहू साखर कारखान्याचा वर्धापन दिन उत्साहात

शाहू साखर कारखान्याचा वर्धापन दिन उत्साहात

राज्यस्तरीय सोयाबीन व भात पीक स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेते अनुक्रमे मधुकर तेलवेकर व मलगोंडा कतगर यांचा सत्कार केला.

यावेळी समरजित घाटगे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शन व कल्पक नेतृत्वाखाली शाहू साखर कारखान्याची स्थापना झाली आहे. सभासद शेतकरी, कर्मचारी, पुरवठादार यांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांच्या शिकवणीनुसारच कारखान्याची वाटचाल सुरू आहे.

संचालक वीरकुमार पाटील, सुदाम बल्लाळ, चंद्रकांत बोंगाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत एच आर मॅनेजर बाजीराव पाटील यांनी केले. शाहू साखर कामगार युनियनचे सचिव बाळासोा तिवारी यांनी आभार मानले.

छायाचित्र-

कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त कारखाना प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले. समरजित घाटगे, श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, वीरकुमार पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Excitement of Shahu Sugar Factory anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.