वन विभागात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:23 IST2021-01-25T04:23:37+5:302021-01-25T04:23:37+5:30
कोल्हापूर : वन परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे दरवर्षी कित्येक वन्यप्राण्यांचा जीव जातो. हे रोखण्यासाठी वन विभागाने ...

वन विभागात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह उत्साहात
कोल्हापूर : वन परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे दरवर्षी कित्येक वन्यप्राण्यांचा जीव जातो. हे रोखण्यासाठी वन विभागाने सातत्याने नागरिकांचे प्रबोधन करावे, असे मत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त ताराबाई पार्क येथील वनविभागाच्या कार्यालयात आरटीओतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
गाजरे म्हणाले, जंगल परिसरातून जाणारा रस्ता निर्मनुष्य असतो. त्यामुळे अनेकदा वाहनचालक आपले वाहन भरधाव चालवितात. अशा वेळी अचानक रस्त्यावर आलेला वन्यजिवाचा अपघातात जीव जातो. त्यामुळे नागरिकांनीही वन परिसरातून जाताना सावधगिरी बाळगली पाहिजे. नागरिकांचेही प्रबोधन करण्याचे काम सातत्याने वनविभागातील कर्मचाऱ्यांनीही करावे. यावेळी वनअधिकारी सुधीर सोनावले, नंदकुमार नलवडे, प्रियांका दळवी, रवींद्र सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.