स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST2021-07-24T04:15:44+5:302021-07-24T04:15:44+5:30

कोल्हापूर : कोटीतीर्थ येथील श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्रात शुक्रवारी गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न झाली ...

In the excitement of Gurupourni at Swami Samarth Kendra | स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात

स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात

कोल्हापूर : कोटीतीर्थ येथील श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्रात शुक्रवारी गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न झाली .

दैनंदिन पूजा करणाऱ्या सेवेकऱ्यांनी पहाटे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक ,षोढपचारे पूजा केली. त्रिकाळ आरती, नैवेद्य दाखवून कोरोना व महापुराचे संकट निवारणासाठी श्री स्वामी चरित्र सारमृत , श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामी समर्थ मंत्र जप अशी सेवा करण्यात आली.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठावर उभारत असलेल्या प. पु. सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलसाठी श्री जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वांचा सहभाग घेतला जात आहे. यात नागरिकांनी योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

---

फाेटो कोलडेस्क ला स्वामी समर्थ केंद्र नावाने

ओळ : गुरुपौर्णिमेनिमित्त कोटीतीर्थ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात विशेष पूजा बांधण्यात आली होती.

---

Web Title: In the excitement of Gurupourni at Swami Samarth Kendra