आजऱ्यात कृषी दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST2021-07-02T04:17:03+5:302021-07-02T04:17:03+5:30
कार्यक्रमात तालुकास्तरीय पीक स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. सभापती उदयराज ...

आजऱ्यात कृषी दिन उत्साहात
कार्यक्रमात तालुकास्तरीय पीक स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. सभापती उदयराज पोवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी दयानंद देसाई यांनी ‘माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा, जमिनीचे आरोग्य व माती परीक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले. जि. प. सदस्य जयवंतराव शिंपी, पं. स. सदस्य रचना होलम, शिरीष देसाई, बशीर खेडेकर, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, तालुका कृषी अधिकारी के. ए. मोमीन, एस. आर. खोराटे यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे यांनी प्रास्ताविक केले. तृप्ती पाटील यांनी सूत्रसंचलन केले.
फोटो ओळी : आजरा पंचायत समितीमध्ये झालेल्या कृषी दिन कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सत्कार करताना सभापती उदय पवार. शेजारी जयवंत शिंपी, शिरीष देसाई, बशीर खेडेकर, बी. डी. वाघ आदी उपस्थित होते.
क्रमांक : ०१०७२०२१-गड-०५