शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घोका आणि ओका शिक्षणपद्धती सोडून ‘नई तालीम’ची कास धरा : मेणसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:01 IST

मेकॉले यांनी सुरू केलेली ‘घोका आणि ओका’ ही शिक्षणपद्धती सोडून ‘नई तालीम’ या गांधी विचारांच्या शिक्षणाची कास धरा, असे आवाहन प्रा. आनंद मेणसे यांनी रविवारी येथे केले.

ठळक मुद्देघोका आणि ओका शिक्षणपद्धती सोडून ‘नई तालीम’ची कास धरा : मेणसेचिल्लर पार्टीच्या चित्रप्रदर्शनास प्रारंभ, पथनाट्याद्वारे केली जनजागृती

कोल्हापूर : मेकॉले यांनी सुरू केलेली ‘घोका आणि ओका’ ही शिक्षणपद्धती सोडून ‘नई तालीम’ या गांधी विचारांच्या शिक्षणाची कास धरा, असे आवाहन प्रा. आनंद मेणसे यांनी रविवारी येथे केले.चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत येथील शाहू स्मारक भवनातील कलादालनात भरविण्यात आलेल्या सेवाग्राममधील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या गांधी विचारांच्या ‘नई तालीम’ विचारावर आधारित चित्रे आणि लिखाणाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. मेणसे यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथील कलादालनात प्रा. आनंद मेणसे यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस गुलाबपुष्प वाहून चिल्लर पार्टीच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी संजय हळदीकर, मिलिंद नाईक उपस्थित होते. (छाया : दीपक जाधव)

मेणसे यांनी आपल्या भाषणात नई तालीम शिक्षणाचा विचार आजही सुरू ठेवण्याची गरज असल्याचे सांगून ‘चिल्लर पार्टी’ने हा विचार पुढे नेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असल्याचे सांगितले. जो शिकतो त्याला श्रमाधिष्ठित शिक्षण मिळाले पाहिजे, या विचारातून गांधीजींनी हा प्रयोग केला.

दुर्दैवाने क्लार्क निर्माण करणारी ब्रिटिशांचीच शिक्षण पद्धती आजही आपण अंगिकारली आहे. ही घोकंपट्टीची पद्धत फेकून देऊन मातृभाषेतून सभोवताली उपलब्ध असणारी व्यवसायाभिमुख शिक्षणपद्धती स्वीकारली पाहिजे, असे मत मेणसे यांनी व्यक्त केले.

गांधीजींनी उद्योग, पर्यावरण, शेतीबरोबरच शैक्षणिक विचारही मांडला, जो आजही सुसंगत आहे. आजचे शिक्षण दुचाकी दुरुस्त करणे, गाईचे दूध काढणे, शेती करणे यासारखे व्यावहारिक शिक्षण देते काय, हा सवाल विचारला पाहिजे. व्हॉट्स अ‍ॅपच्या भ्रष्ट आणि चुकीच्या भाषेतून व्यक्त होणाऱ्या नव्या पिढीला गांधीजींच्या या कृतिशिक्षणाची ओळख करून देणे गरजेचे आहे. प्रत्येक भाषेतून माणसे जोडली जातात, त्यासाठी ‘जग बघा, पुन्हा परत या, देश समजून घ्या,’ असा संदेश गांधीजींनी दिला होता, तो व्यवहारात आणा, असेही मेणसे म्हणाले.या चित्रप्रदर्शनाचे संकल्पक संजय हळदीकर यांनी सेवाग्राममध्ये अनुभवलेले प्रसंग सांगितले. ‘नई तालीम’च्या शैक्षणिक विचारातून काम मिळते, हे तेथील ‘आनंद निकेतन’ शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रांच्या आणि लिखाणातून मांडले आहे. ते अनुभवण्यासाठी या चित्रप्रदर्शनाला भेट द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमात प्रशांत पितालिया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. चिल्लर पार्टीने प्रकाशित केलेल्या ‘पोरांचा सिनेमा’ हे पुस्तक यावेळी पाहुण्यांना भेट देण्यात आले. प्रदर्शनाचे समन्वयक मिलिंद कोपार्डेकर यांनी प्रास्ताविक केले; तर मिलिंद नाईक यांनी आभार मानले.गांधी फॉर टुमारो पथनाट्याचे सादरीकरणप्रारंभी संजय हळदीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या गांधी फॉर टुमारो या पथनाट्याचे सादरीकरण झाले. शिवाजी मराठा हायस्कूलच्या आदित्य सावंत, समीक्षा लोंढे, सुप्रीत कांबळे, सुजल कांबळे, राजनंदिनी सावंत, अनिता जाधव, पूजा पाटील, शिवराज कांबळे, करीना गळवे या विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर केले. या समारंभास बेळगावचे ए. बी. जाधव, मिलिंद यादव, अभय बकरे, पद्मश्री दवे, शिवप्रभा लाड, सलीम महालकरी, अनिल काजवे, विजय शिंदे, रवींद्र शिंदे, आदी उपस्थित होते.प्रदर्शन १३ मार्चपर्यंतहे प्रदर्शन १३ मार्चपर्यंत शाहू स्मारक भवनातील कलादालनात सकाळी १0 ते रात्री ९ या वेळेत खुले राहणार आहे. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर