शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्ड्यांवर पॅचवर्कचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 16:10 IST

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते उजळाईवाडी उड्डाणपूल येथेपर्यंतचा प्रवास खड्ड्यांमुळे धोक्याचा बनला आहे. एक ते दीड फुटाचे खोल खड्डे पडल्याने वाहने जोरात आदळत आहेत.

ठळक मुद्देपाऊस ओसरल्याने डागडुजी सुरू कागल ते उजळाईवाडीपर्यंतचा प्रवास धोक्याचा

कोल्हापूर: पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते उजळाईवाडी उड्डाणपूल येथेपर्यंतचा प्रवास खड्ड्यांमुळे धोक्याचा बनला आहे. एक ते दीड फुटाचे खोल खड्डे पडल्याने वाहने जोरात आदळत आहेत. पावसाचा जोर ओसरल्याने राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पॅचवर्क करण्याचे काम सुरू करण्यात आले. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी पॅचवर्कचा दर्जा पाहता आणखी एक-दोन मोठ्या पावसांतच ते पुन्हा उखडण्याची शक्यता आहे.राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते उजळाईवाडी येथपर्यंत जवळपास १२ ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. कर्नाटकच्या हद्दीतून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर दूधगंगा नदीच्या पुलापासून खड्ड्यांचे दर्शन सुरू होते. आरटीओ चेकपोस्ट नाक्यासमोर तर या खड्ड्याने अपघातही घडला आहे. तसेच पुढे आल्यावर कागल मध्यवर्ती बसस्थानकाजवळच्या बोगद्यावरील आणि त्याच्या पुढे गेल्यावर अखिलेश पार्कच्या समोर तर खड्ड्यांमुळे झालेली चाळण पाहिली की हा राष्ट्रीय महामार्ग आहे की गल्लीतील रस्ता असा प्रश्न पडावा असे चित्र आहे.

कागलजवळ लक्ष्मी टेकडीसमोर असलेला खड्डा तर वाहन जोरात आदळल्यानंतरच दिसतो. तीच परिस्थिती पुढे कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव आणि सुदर्शन पेट्रोल पंपासमोर आहे. वाहन चालवताना खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागते.दर उन्हाळ्यात महामार्गाची डागडुजी होते; पण यावर्षी लॉकडाऊनमुळे केवळ साईटपट्ट्या भरण्याचे काम झाले. रस्त्यांचे डांबरीकरण झालेच नाही. शिवाय पाणी वाहून जाण्यासाठी मोऱ्यांची दुरुस्तीही झाली नाही. त्यामुळे आठ दिवसांच्या पावसातच महामार्गावरील पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने खड्डे पडण्यास सुुरुवात झाली.

कागल, एमआयडीसी पूल, गोकुळ शिरगाव, सुदर्शन पेट्रोल पंप, मयूर पंप या ठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहतात. यातून रस्ते खराब होत आहेत. बुधवारी या रस्त्यावर डांबर-खडीचे मिश्रण टाकून ते तात्पुरते भरण्याचे काम सुरू होते; पण त्याचा दर्जा पाहता ते आणखी दोन पावसांतच पूर्णपणे उखडून जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाkolhapurकोल्हापूर