शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी; शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 17:48 IST

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठअंतर्गत सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परंतु, पावसाचा जोर कायम राहिल्याने आज, मंगळवार ...

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठअंतर्गत सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परंतु, पावसाचा जोर कायम राहिल्याने आज, मंगळवार व उद्या, बुधवार या दोन दिवसांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. परिणामी, वाहतुकीस अडथळा येत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यास त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थीहित लक्षात घेता शिवाजी विद्यापीठाने आज, मंगळवार आणि उद्या, बुधवारी होणाऱ्या सर्व विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पुढे ढकललेले पेपर कधी होणार या संदर्भातील माहिती यथावकाश शिवाजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तरी महाविद्यालय व विद्यार्थ्यांनी पेपर पुढे ढकलले आहेत, याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा विभागाकडून करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसShivaji Universityशिवाजी विद्यापीठexamपरीक्षा