तलाठी पदाची १३ सप्टेंबरला परीक्षा

By Admin | Updated: August 27, 2015 00:23 IST2015-08-27T00:23:43+5:302015-08-27T00:23:43+5:30

३८ जागा : आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

Examination of Talathi's post on September 13 | तलाठी पदाची १३ सप्टेंबरला परीक्षा

तलाठी पदाची १३ सप्टेंबरला परीक्षा

कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल उपविभागीय कार्यालयांमध्ये तलाठी संवर्गातील ३८ पदांची भरती होणार आहे. विविध जाती प्रवर्गातील या पदांसाठी १३ सप्टेंबरला परीक्षा होणार आहे. यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असून, बुधवारपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे.महसूल विभाग उपसचिव यांच्या आदेशानुसार तलाठी संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ७५ टक्के पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्हा महसूल उपविभागीय आस्थापनेवरील तलाठी पदे भरण्यात येणार आहेत. एकूण ३८ पदे असून, यामध्ये अनुसूचित जातीसाठी - ७, अनुसूचित जमातीसाठी - १३, विमुक्त जाती (अ)साठी - १, भटक्या जमाती (ड) - १, इतर मागास प्रवर्गसाठी - ९ व खुल्या प्रवर्गासाठी ७ जागांचा समावेश आहे. तलाठी पदासाठी २०० गुणांची ही परीक्षा होणार आहे. यासाठी आॅनलाईन पद्धतीने ँँ३३स्र://६६६.‘ङ्म’ँंस्र४१ी७ें.ूङ्मे या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येणार आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. १ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखांमध्ये फी स्वीकारण्याचा कालावधी आज, गुरुवारपासून २ सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात आला आहे. अर्ज स्वीकृतीनंतर ७ सप्टेंबरपासून ई-प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. १३ सप्टेंबरला सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत तलाठी पदासाठी लेखी परीक्षा होणार आहे.(प्रतिनिधी)

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
तलाठी पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता आहे. उमेदवाराचे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून किमान वय १८ वर्ष असावे, तर खुल्या प्रवर्गासाठी ३३ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल ३८ वर्षे, अंशकालीन उमेदवारांसाठी ४६ वर्षे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व अपंग उमेदवारांसाठी ४५ वर्षे अशी अट आहे, तर खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन या पदासाठी असलेली वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल केली जाणार आहे.

Web Title: Examination of Talathi's post on September 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.