शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षाच्या परीक्षांतील गैरहजर विद्यार्थ्यांची १७ डिसेंबरपासून परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 10:42 IST

Shivaji University, online, exam, kolhapur, Student कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या विविध ११८ पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील अखेरच्या सत्रातील परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाल्या. या परीक्षांना काही कारणांमुळे गैरहजर राहिलेल्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांची परीक्षा दि. १७ आणि १८ डिसेंबर रोजी होणार आहेत.

ठळक मुद्देअंतिम वर्षाच्या परीक्षांतील गैरहजर विद्यार्थ्यांची १७ डिसेंबरपासून परीक्षा ऑनलाईन स्वरूप : शिवाजी विद्यापीठातील तीन हजार विद्यार्थी

कोल्हापूर : कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या विविध ११८ पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील अखेरच्या सत्रातील परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झाल्या. या परीक्षांना काही कारणांमुळे गैरहजर राहिलेल्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांची परीक्षा दि. १७ आणि १८ डिसेंबर रोजी होणार आहेत.

ऑनलाईन स्वरूपात सकाळी अकरा ते सायंकाळी सहा यावेळेत विविध चार सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे. त्याचे वेळापत्रक शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने सोमवारी जाहीर केले आहे.कोरोना पॉझिटिव्ह अथवा क्वॉरंटाईन व्हावे लागल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आणि तांत्रिक अडचणींमुळे सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा देता आली नाही. त्यांची स्वतंत्रपणे परीक्षा घेणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.

विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षार्थींची (रीपिटर) उन्हाळी सत्रातील परीक्षा (विधी (लॉ), औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी), अभियांत्रिकी अभ्यासक्रम वगळता) दि. १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. महाविद्यालय पातळीवर ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने ५० गुणांच्या या परीक्षा होणार आहेत. त्यासाठी एक तासाचा वेळ असून बहुपर्यायी (एमसीक्यू) प्रश्नपत्रिका असणार आहे.विद्यार्थ्यांनी नोंदणी करावीया परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक, ई मेल, परीक्षेचा विषय, आदी माहिती त्यांनी नोंदणीवेळी द्यावी. अधिक माहितीसाठी महाविद्यालय अथवा विद्यापीठातील परीक्षा मंडळ येथे संपर्क साधवा.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठonlineऑनलाइनexamपरीक्षाkolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी