माजी नगरसेविकेच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST2021-03-27T04:26:11+5:302021-03-27T04:26:11+5:30
इचलकरंजी : जवाहरनगर येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या पतीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी ...

माजी नगरसेविकेच्या पतीवर विनयभंगाचा गुन्हा
इचलकरंजी : जवाहरनगर येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेच्या पतीवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तानाजी महादेव भोकरे (वय ४५, रा. जवाहरनगर) असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. याबाबतची तक्रार पीडित महिलेने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पीडित महिलेच्या भावाने तानाजी याच्याकडून डी.एड. शिक्षणासाठी उसनवार म्हणून १५ हजार रुपये घेतले होते. पीडितेच्या भावाने तानाजी याला वेळोवेळी पैसे दिले होते. तरीही शुक्रवारी डेक्कन परिसरामध्ये तानाजी हा दारू पिऊन येऊन पीडित महिलेच्या भावास माझ्याकडून घेतलेले पैसे दे, असे म्हणत शिवीगाळ करून त्याला व त्याच्या आईला मारहाण केली. तसेच पीडितेला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.