शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

ईडब्लूएस आरक्षण: मराठा समाजातील ६५ तरुणांचा पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल लटकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 12:46 IST

आरक्षण अवैध ठरविल्याने हे प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले

कोल्हापूर : मराठा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना (ईडब्लूएस) नोकरीत दिलेले आरक्षण अवैध ठरविल्याने या समाजातील ६५ उमेदवारांचा पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२० मध्ये ६५० जागांसाठी पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा घेण्यात आली. मराठा समाजाचे आरक्षण रद्द ठरविल्याने त्यांना आर्थिक दुर्बल कोट्यातून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक उमेदवारांनी या कोट्यातून अर्ज भरले होते. पुढे हे आरक्षण अवैध ठरविल्याने हे प्रकरण पुन्हा न्यायालयात गेले आहे. 

परिणामी, या परीक्षेचा निकाल गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित ठेवला होता. इतर वर्गातील उमेदवारांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर आयोगाने मराठा समाजातील ६५ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवत या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला. मात्र, यामुळे मराठा समाजातील उमेदवारांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.

आमचाच निकाल मागे का२०२० मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदासह विक्रीकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी या पदासाठी संयुक्त जाहिरात काढण्यात आली होती. यातील विक्रीकर व कक्ष अधिकारी पदाच्या मुलाखती होऊन त्यांना नियुक्त्याही देण्यात आल्या. मग पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल का प्रलंबित ठेवला आहे, असा सवाल उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे.

ते ३५० विद्यार्थी आशेवरचपोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा होऊन त्यासाठी मुलाखतीही घेण्यात आल्या. मराठा समाजाच्या आर्थिक दुर्बल घटकातील ३५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या; पण अद्याप निकाल जाहीर न झाल्याने हे सर्व विद्यार्थी आशेवर बसले आहेत.

ईडब्लूएसचा विषय न्यायालयात प्रलंबित असला तरी त्यात आमचा काय दोष आहे. या परीक्षेसाठी रात्रंदिवस अभ्यास केला होता. ईडब्लूएस वर्गातील उमेदवारांचा निकाल प्रलंबित ठेवला आहे. आम्ही आणखी किती दिवस वाट पाहायची. यामुळे आमच्या करिअरचे नुकसान होणार आहे. - एक परीक्षार्थी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षाreservationआरक्षण