विकासकामांबरोबर शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:17 IST2021-07-19T04:17:25+5:302021-07-19T04:17:25+5:30

आ. आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुक्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा पातळीवरील मोठी पदे देऊन त्यांचा सन्मान केला ...

Everyone should make efforts for Shiv Sena party growth along with development works | विकासकामांबरोबर शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

विकासकामांबरोबर शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

आ. आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला तालुक्यातील विविध विकासकामे करण्यासाठी जिल्हा पातळीवरील मोठी पदे देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

त्या पदाचा वापर विकासकामे करून पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुण जाधव यांनी आवाहन केले.

या तालुक्यात जिल्हा दूध संघ (गोकुळ) संचालक, मार्केट कमिटी प्रशासकीय सदस्य, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती, संजय गांधी राष्ट्रीय निराधार योजना तालुका अध्यक्ष, पणन महासंघ सदस्य, रोजगार हमी जिल्हा सदस्य, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य, पंचायत समिती सभापती अशी मोठी पदे या तालुक्याच्या विकासासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्या माध्यमातून पक्षवाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आ. आबिटकर यांनी म्हटले आहे.

आ. आबिटकर यांनी विविध विकासकामे करण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जिल्हा पातळीवरील मोठी पदे देऊन त्यांचा सन्मान केल्याबद्दल आ. आबिटकर यांचा सत्कार शामराव भावके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अशोक फराकटे, राजेंद्र चौगले, विश्वनाथ पाटील, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष विलास पाटील, वंदना जाधव, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Everyone should make efforts for Shiv Sena party growth along with development works