शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

सीपीआरमध्ये श्वानदंशाचे रोज सरासरी ८० रुग्ण पाच महिन्यांत ४ बळी : रेबिजप्रतिबंधक लसीचा तुटवडा; रुग्णांना आर्थिक भुर्दंड - कुत्र्यांचा जोर... नागरिकांना घोर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:09 IST

मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेले दररोज ८० ते ९० रुग्ण शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल होतात. जानेवारीपासून २८ जून अखेर रेबिजने तीन जणांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला आहे.

चंद्रकांत कित्तुरे ।कोल्हापूर : मोकाट कुत्र्यांनी चावा घेतलेले दररोज ८० ते ९० रुग्ण शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) दाखल होतात. जानेवारीपासून २८ जून अखेर रेबिजने तीन जणांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला आहे. तर एकजण अन्यत्र दगावला आहे. यावरून या कुत्र्यांची दहशत लक्षात यावी. या रुग्णांना द्याव्या लागणाऱ्या रेबिज प्रतिबंधक लसीचा सध्या तुटवडा असल्याने प्रत्येक रुणाला किमान लसीचा एक डोस येथे दिला जातो. उर्वरित डोस बाहेर घेण्यास किंवा विकत आणण्यास सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णांना सुमारे दोन-अडीच हजारांचा भुर्दंड सोसावा लागतो.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातच मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर आहे. कुत्रा चावला की द्यावी लागणारी रेबिज प्रतिबंधक लस प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, महापालिका, नगरपालिका रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने आणि असल्या तरी अन्य काही कारणांने श्वानदंशांचे रुग्ण सीपीआरमध्ये पाठविण्याचे प्रमाण मोठे आहे.दररोज सरासरी ८० ते ९० रुग्ण म्हणजे महिन्याला सुमारे २५०० आणि वर्षाला सुमारे ३० हजार रुग्ण सीपीआरमध्ये श्वानदंशावर उपचार घेतात. अन्य सरकारी रुग्णालयांत तसेच खासगी रुग्णालयांत श्वानदंशाची लस घेणाºयांची संख्या यापेक्षाही अधिक असू शकते.

तीन प्रकारचे रुग्ण :कुत्र्याने चावा घेतला आहे पण रक्त आलेले नाही, असे रुग्ण पहिल्या वर्गात मोडतात. त्यांना कोणताही धोका नसतो. कुत्रा चावलेल्या ठिकाणी रक्त आले आहे पण जखम खोलवर नाही असे रुग्ण दुसºया वर्गात मोडतात, तर कुत्र्याने हल्ला करून अनेक ठिकाणी चावा घेऊन गंभीर जखमी केलेले रुग्ण तिसºया वर्गात मोडतात. दुसºया वर्गातील रुग्णांना लसीचे सहा डोस देणे आवश्यक असते, तर तिसºया वर्गातील रुग्णांना इंट्रा मस्क्युलर आणि इंट्रा डरमल अशा दोन्ही प्रकारच्या लसी द्याव्या लागतात. त्या अधिक खर्चिक असतात.पिसाळलेला कुत्रा असेल तरच रेबिजचा धोकाकुत्रा पिसाळलेला असेल तरच रुग्णाला रेबिजचा धोका सर्वाधिक असतो. कारण कुत्र्यांच्या थुंकीतील रेबिजचे विषाणू तो ज्याला चावला आहे त्याच्या शरीरात प्रवेश करतात आणि शरीरात पसरतात. ते मेंदूपर्यंत पोहोचले तर तो रुग्ण आठ-दहा दिवसांतच मरतो तसेच रेबिजची लागण झालेला कुत्राही आठ-दहा दिवसांत मरतो किंवा त्याला मारावे लागते.विद्यापीठ परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशतशिवाजी विद्यापीठ परिसरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी चालायला येणाºयांची संख्या हजारोंच्या घरात आहे.तसेच विद्यापीठ परिसरात मोरांची संख्याही मोठी आहे. या परिसरात कुत्र्यांच्या पाच-सहा टोळ्या आहेत.त्या समूहाने मोर आणि त्यांच्या पिलांवर हल्ले करतात तसेच पादचाºयांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकारही घडतआहेत.त्यामुळे या परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ‘मॉर्निंग वॉक’ला जाणाºया काहीजणांनी केली आहे.दररोज सरासरी ८० ते ९० रुग्ण म्हणजे महिन्याला सुमारे २५०० आणि वर्षाला सुमारे ३० हजार रुग्ण सीपीआरमध्ये उपचार घेतात.रेबिजचा धोका टाळण्यासाठी हे कराकुत्रा चावल्यास (तो पिसाळलेला नसेल तर) घाबरून न जाता ज्या ठिकाणी चावा घेतला आहे ती जागा पाणी आणि साबणाने पाच मिनिटे नळाखाली अथवा पाण्याखाली धरून स्वच्छ धुतली असता रेबिज होण्याची शक्यता नसते, असे सीपीआरचे उपअधिष्ठाता डॉ. सुदेश गंधम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कुत्र्यांना वैतागलाय... तर मग लिहा..मोकाट कुत्र्यांना तुम्हालाही कधीतरी तोंड द्याव लागले असेल.. तुमचा चावा घेतला असेल अगर अपघात घडवला असेल.. ज्याची आठवण झाली की अजूनही भीती वाटते, संताप होतो. हे कुणाला तरी सांगावसं वाटत, उपाय सुचवावेसे वाटतात.. तर मग करा आपल मन मोकळ... लिहा आपल्या भावना ,मते आणि पाठवा आमच्याकडे... (शब्दमर्यादा २०० ) आमचा पत्ता- लोकमत भवन, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ , लक्ष्मीपूरी ,कोल्हापूर, व्हॉटसअ‍ॅप नं.- ८९७५७५५७५४, इमेल- ‘koldesk@gmail.com(क्रमश:)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdogकुत्राhospitalहॉस्पिटल