प्रत्येक कामगाराला लॅपटॉपसाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST2021-02-05T07:09:06+5:302021-02-05T07:09:06+5:30
कोल्हापूर : मुलांना ऑनलाइन शिक्षण द्यावे लागत असल्यामुळे प्रत्येक कामगाराला एक लॅपटॉप देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबई कामगार आयुक्त कार्यालयाकडे ...

प्रत्येक कामगाराला लॅपटॉपसाठी प्रयत्नशील
कोल्हापूर : मुलांना ऑनलाइन शिक्षण द्यावे लागत असल्यामुळे प्रत्येक कामगाराला एक लॅपटॉप देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुंबई कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी माहिती अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे राज्याचे प्रभारी राज अटकोरे यांनी दिली. संघटनेच्या पाठपुराव्यामुळेच प्रत्येक कमागाराला ३० हजारांची भांडी वाटप सुरू झाली असल्याचेही त्यांनी केले. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या लक्ष्मीपुरी, कोंडा ओळ येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अटकोरे म्हणाले, होमगार्डना कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. यावर निर्णय झाला नाही तर पुढील काळात संघर्ष करावा लागेल. यावेळी लोकजनशक्ती पार्टीचे बाळासाहेब भोसले, लाल निशाणचे प्रकाश जाधव, पीपल्स रिपब्लिक पार्टीचे दगडू भास्कर, सांगलीचे संजय कांबळे, प्रभाकर माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत वाघमारे यांनी प्रस्ताविक केले, तर संजय गुदगे यांनी स्वागत केले. प्रीतम कांबळे, संभाजी कागलकर, भारत कोकाटे आदी उपस्थित होते.
फोटो : ३१०१२०२१ कोल कामगार संघटना न्यूज
ओळी : अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेच्या लक्ष्मीपुरी, कोंडा ओळ येथील जनसंपर्क कार्यालयाचे रविवारी उद्घाटन झाले. संघटनेचे राज्याचे प्रभारी राज अटकोरे यांनी मार्गदर्शन केले.