प्रत्येक दिवस महिलादिन म्हणून साजरा व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:53+5:302021-03-09T04:26:53+5:30
शिरोली : प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, त्यामुळे प्रत्येक दिवस हा महिला दिन साजरा केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी ...

प्रत्येक दिवस महिलादिन म्हणून साजरा व्हावा
शिरोली : प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, त्यामुळे प्रत्येक दिवस हा महिला दिन साजरा केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. त्या शिरोली येथील उन्नती महिला ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी महाडिक म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. म्हणूनच प्रत्येक दिवशी महिला दिन साजरा केला पाहिजे. महिलांनी काम करत असताना आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. यावेळी लोटस मेडिकल फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य मार्गदर्शन व तपासणी शिबिर आयोजित केले होते. फाउंडेशनचे अमित गायकवाड व उमा व्हटकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या आरोग्य तपासणीत सुमारे २५० महिलांची तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन उन्नती महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा व ग्रामपंचायत सदस्या पुष्पा पाटील यांनी केले. कार्यक्रमाला पूनम सोडगे, सारिका शिंदे, शिल्पा वठारे, मीनाक्षी जाधव, कविता मोरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
फोटो: ०८ शिरोली महिला दिन
शिरोली येथील उन्नती महिला ग्रामसंघाच्या वतीने आयोजित केलेल्या महिला आरोग्य शिबिरात महिलांना मार्गदर्शन करताना शौमिका महाडिक, शेजारी पुष्पा पाटील व इतर.