शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- Balumama Temple Adamapur: न्यायप्रविष्ट जमिनीच्या संचकारपत्रास २५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:58 IST

कायदेशीर प्रक्रिया न अवलंबताच केले व्यवहार

शिवाजी सावंतगारगोटी : आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिराच्या सुविधांसाठी घेतलेल्या जमिनीचे वाद न्यायप्रविष्ठ असताना देखील २५ लाख २३ हजार ९५० रुपये देऊन त्यांच्याशी संचकारपत्र करण्यात आले आहे. याशिवाय जमीन तहसीलदार एनए असताना भूखंड असल्याचे दाखवून संचारकारपत्र केले आहे. आदमापूर येथील गट क्रमांक १८६/१,१८६/२,१८७,१८८,१८९ या गटामधील १३५.३४ गुंठे जमिनी देवस्थानसाठी खरेदी करण्यासाठी भूखंड दाखवून त्या दराने खरेदी केल्या आहेत.त्यामध्ये गट क्रमांक १८६/२ गटातील ३७.३४ गुंठे जमिनीच्या मालकी हक्काबाबत न्यायालयात लढा सुरू आहे. 

न्यायप्रविष्ठ असलेल्या या जमिनीचे संचकारपत्र करण्यात आले आहे. यामध्ये तत्कालीन कार्याध्यक्षा रागिणी खडके आणि सचिव संदीप मगदूम यांचा समावेश आहे. याबाबत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नामदेव खेबुडे आणि इतर सहाजण यांनी तक्रार केली आहे. कोणत्याही जमिनी खरेदी करताना विश्वस्तांच्या बैठकीत बहुमताने ठराव मंजूर करून घेतलेला नाही. मंजूर ठरावास धर्मादाय उपायुक्त यांच्या परवानगीसाठी प्रस्ताव सादर केलेले नाहीत.

वाचा : बाळूमामा देवस्थानने रस्ता नसताना वाहनतळासाठी निढोरीत घेतली जागाभूमी अभिलेख कार्यालयाच्या "सी" प्रतिनुसार क्षेत्रनिहाय खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.त्यामुळे या प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांवर दोषारोप दाखल करावेत. कार्याध्यक्ष सचिव यांना पदमुक्त करून त्यांच्यावर पैशांच्या अपव्ययाची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी तक्रारदारांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे केली आहे.याबाबत तत्कालीन कार्याध्यक्षा रागिणी खडके यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, या जमिनीचे संचकारपत्र करताना रीतसर अग्रगण्य दैनिकात प्रसिद्धी देण्यात आली होती. त्यावेळी या मालकी हक्काच्या दाव्याबाबत कोणतेही लेखी पत्र अथवा हरकत आलेली नाही.त्यामुळे सर्व व्यवहार कायदेशीर अटी व शर्तीची पूर्तता करून व पारदर्शी केला आहे.देवस्थानच्या नजीक असलेल्या या जमिनी बाजारभावापेक्षा कमी भावाने खरेदी केल्या आहेत. याची माहिती असतानाही ज्यांनी तक्रार दाखल केली आहे, त्यातील कोणाचे नेमके कोणते हितसंबंध गुंतले होते ? याची माहिती परिसरातील लोकांना आहे. माझ्या काळात पारदर्शी व्यवहार सुरू केल्याने मला तेथून हटवण्यासाठी कोणी काय-काय केले, हे जगजाहीर आहे. कुणाला किती संचकार..?नामदेव खेबुडे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, पदाधिकाऱ्यांनी १८६/२ गटातील १. रेखा भाट : ७ लाख ५० हजार ७५० २. जितेंद्र भाट : ६ लाख ७ हजार ७५० आणि ३. सुभाष ढेरे : ११ लाख ६५ हजार ४५० रुपये धनादेशद्वारे ४ आणि ५ मे २०२५ ला अदा केले आहेत. याशिवाय अन्य सहा भूखंडधारकांना देखील रकमा दिल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Balumama Temple Land Deal Under Scrutiny; ₹25 Lakh Paid

Web Summary : Controversy surrounds Balumama Temple land deal. Despite a land dispute pending in court, ₹25 lakh was paid. Allegations include irregularities in land classification and lack of trustee approval for the purchase. A complaint has been filed, seeking investigation and action against involved officials.