शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: ईर्ष्या दिसली, पहिल्याच दिवशी ५१० अर्जांची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:46 IST

मतदान यंत्रे पुढील आठवड्यात येणार

कोल्हापूर : विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली, नामनिर्देशनपत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झाला नसला, तरी एका दिवसात ५१० नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली. नामनिर्देशनपत्रांच्या विक्रीचा हा आकडा निवडणुकीतील ईर्ष्या स्पष्ट करणारा आहे.

दरम्यान, प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुद्धा निवडणूक कामकाजात सहभागी न झालेल्या ५० कर्मचाऱ्यांना निलंबन का करू नये, म्हणून प्रशासकांनी नोटीस काढल्या आहेत. महापालिकेची १५ जानेवारीस निवडणूक आणि १६ ला मतमोजणी होणार आहे.सकाळी अकरा वाजल्यापासून निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली. पहिलाच दिवस उत्सुकतेचा, माहिती घेण्याचा ठरला. शहरातील सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नागरिकांनी गर्दी केली. इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक निवडणूक कार्यालयात उत्सुकतेपोटी विविध प्रकारची माहिती विचारत होते, तसेच नामनिर्देशनपत्रांची खरेदी करत होते. एकेक व्यक्ती चार-चार नामनिर्देशनपत्रे घेत असल्याचे पाहायला मिळाले.प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वेगवेगळी टेबल ठेऊन त्याठिकाणी मतदान केंद्रनिहाय यादी, नामनिर्देशनत्रांची विक्री, नाहरकत दाखले देण्यासाठी एक खिडकी, जात पडताळणी प्रमाणपत्र पडताळणीसाठी फॉर्म क्रमांक १५ ए देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्रांची किती विक्री झाली, यासह प्राप्त होणाऱ्या नामनिर्देशनपत्रांची नोंदी ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्रांचे शुल्क, तसेच अनामत रक्कम स्वीकारण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सर्व कार्यालये संगणकीय यंत्रणेसह सज्ज आहेत.

कसा आहे अर्ज ?शंभर रुपयांना दिला जाणार ३७ पानांचा हा अर्ज आहे. त्यात संबंधित उमेदवाराने स्वत:ची सर्व माहिती भरायची आहे, शपथपत्र तसेच मालमत्तेची माहितीही याच अर्जातून द्यायची आहे.

कार्यालयाचे नाव - नामनिर्देशनपत्रांची विक्री१. महासैनिक प्रशिक्षण केंद्र, लाइन बाजार - ८१२. व्ही. टी. पाटील सभागृह, राजारामपुरी - ४६३. दुधाळी पॅव्हेलियन - ७२४. राजोपाध्ये बॅडमिंटन हॉल - ६६५. गांधी मैदान कार्यालय - ५६६. शहाजी कॉलेज सभागृह - १३१७. मेजर ध्यानचंद हॉक स्टेडियम - ५८एकूण अर्जांची विक्री - ५१०

मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणमहानगरपालिका निवडणुकीसाठी शहरात ५८४ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्रावर एकूण ३०३६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मंगळवारी त्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांना मतदानासंबंधी येत्या रविवारी (दि. २८ डिसेंबर) प्रशिक्षण दिले जाणार आहे. व्ही. टी. पाटील सभागृह, गडकरी हॉल, विवकानंद कॉलेज हॉल, राजाराम कॉलेज हॉल येथे दिवसभर हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे.

५० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसनिवडणुकीचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले, तरी नेमून दिलेल्या ठिकाणी कामावर हजर न राहिल्याबद्दल मंगळवारी ५० कर्मचाऱ्यांना प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी कारणे दाखवा नोटीस दिली. आपणास निलंबित का करू नये, अशी विचारणा करतानाच चोवीस तासांत खुलासा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जे कर्मचारी खुलासा देऊन कामावर हजर होणार नाहीत, अशांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.

मतदान यंत्रे पुढील आठवड्यात येणारनिवडणुकीसाठी महापालिका प्रशासकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे ६५० मतदान यंत्रांची मागणी केली आहे. ती पुढील आठवड्यात मिळतील असे सांगण्यात आले. यंत्रे ताब्यात येताच ती वापरण्यास योग्य आहेत की नाही यांची प्रत्यक्ष खात्री करून घेण्याचे काम तत्काळ सुरू केले जाणार आहे.

चार दिवसांत १८ लाखांचा भरणानामनिर्देशनपत्र भरताना संबंधित उमेदवारास महापालिकेचे कोणतेही देणे लागत नाही, असा ना हरकत दाखला सादर करावा लागणार आहे. गेल्या तीन-चार दिवसांत अशा देण्यापोटी १८ लाखांच्यावर महसूल जमा झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रशासकांच्या कार्यालयांना भेटीप्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्रे भरण्यास सुरुवात झाल्यानिमित्ताने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी होते.

आणखी ५०० नामनिर्देशनपत्रे छापणारप्रशानाने १५०० नामनिर्देशनपत्रे छापली आहेत, परंतु पहिल्याच दिवशी ५१० अर्जांची विक्री झाल्याने आणखी जादा ५०० नामनिर्देशनपत्रे छापून घेण्यात येणार आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Election 2026: High Demand for Nomination Forms Signals Intense Competition

Web Summary : Kolhapur's municipal election process began with high enthusiasm. 510 nomination forms were sold on the first day despite no forms being submitted. 50 employees face suspension notices for absence. Elections are scheduled for January 15th, with vote counting on January 16th. Additional nomination forms are being printed due to demand.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६