शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बोटांचे ठसे न उठणाऱ्यांनाही आता मिळणार रेशनचे धान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 16:08 IST

कोल्हापुरातील रेशन धान्य दुकानदारांना फोरजी ई पॉस मशीन वाटपास सुरुवात

कोल्हापूर : रेशन दुकानातील पॉश मशीनवर बोटांचे ठसे न उठणाऱ्यांनाही धान्य मिळण्यासाठी आय स्कॅनरसह फोरजी पॉश मशीन वाटपास शुक्रवारी सुरुवात झाली. शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याहस्ते मशीनचे वाटप झाले. आज, शनिवारपासून जिल्ह्यातील सर्व दुकानदारांना मशीन वाटपाला सुरुवात होणार आहे.३१ मे अखेर जिल्ह्यातील सर्व १६७२ रेशन दुकानदारांना मोफत मशीन देण्यात येणार आहे. यामुळे जून महिन्यातील धान्य नव्या मशीनमधून होणार आहे. मशीनवर बोटाचे ठसे आले नाहीत तर आय स्कॅनरवरून धान्य वाटप करण्यात येणार आहे.स्वस्त धान्य दुकानातून दर महिन्याला धान्य घेण्यासाठी पॉश मशीनवर थंब करणे बंधनकारक आहे. धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकतेसाठी ही पध्दती कार्यान्वित आहे. पण हाताने कष्टाची कामे केल्याने काही महिला व पुरुषांच्या हाताचे ठसे नाहीसे झाल्याने मशीनवर ठसे उमटत नसत. परिणामी त्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत होते. म्हणून शासनाने फोरजी आयस्कॅनरसही ई पॉश मशीन देत आहे. त्याचे वितरण सुरू झाले.जिल्हा पुरवठा कार्यालयात झालेल्या नवीन मशीन वितरणाच्या कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटना अध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हा तांत्रिक विभागाचे कर्मचारी करण गायकवाड, सुहास पाटील, विठ्ठल गायकवाड, सुभाष जाधव किरण गाडे, माणिक भालेकर, सुमित पवार उपस्थित होते.दरम्यान, आज शनिवारी करवीर, गडहिंग्लज, रविवारी पन्हाळा, आजरा, सोमवारी हातकणंगले, भुदरगड, मंगळवारी इचलकरंजी, राधानगरी, बुधवारी शिरोळ, कागल तर गुरुवारी गगनबावडा तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांना मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर