शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पदे मस्त, तरी शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते अस्वस्थ; सत्ता येऊन दहा महिने झाले तरी नव्या नियुक्त्या नाहीत

By समीर देशपांडे | Updated: April 25, 2023 12:55 IST

याआधी झाला होता भ्रमनिरास

समीर देशपांडेकोल्हापूर : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येऊन दहा महिने झाले तरी शासनाची विविध महामंडळे, समित्यांवर नेते, कार्यकर्त्यांना अजूनही संधी मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.महाविकास आघाडीचे सरकार असतानाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होऊन विविध समित्यांवर नेते, कार्यकर्ते यांना संधी देण्यासाठी विलंब झाला आणि अडीच वर्षे सरकार असूनही कार्यकर्त्यांना संधी देता आली नव्हती. जिल्हा नियोजन समितीवर ज्यांची नियुक्ती केली होती त्यांना एकही बैठक हजर राहता आली नाही तोपर्यंत उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि सरकारच पडले.त्यानंतर शिंदे, फडणवीस यांचे सरकार येऊन दहा महिने होत आले. परंतु काही तालुक्यांच्या संजय गांधी निराधार समितीच्या निवडी सोडल्या तर अनेक महामंडळे, समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी फारशी आग्रही भूमिका घेताना कोणी दिसत नाही अशी परिस्थिती आहे. एकीकडे लोकसभेला मिळेल त्याचा पाठिंबा घेण्याची तयारी भाजपने सुरू केली असताना वेळ पडली तर आपल्या कार्यकर्त्यांना गप्प करता येईल परंतु पाठबळ देणाऱ्या इतरांना बळ देण्याची भूमिका भाजप घेताना दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नेते, कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय प्रामु्ख्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक घेतील असे दिसते. तर शिवसेनेकडून नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने हे या निर्णय प्रक्रियेत असतील. त्यादृष्टीने प्राथमिक सूचनाही देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.राज्यातील सध्याची राजकीय स्थिती बेभरवशाची असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. अशा स्थितीत शिंदे, फडणवीस कोणताही असा निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे सांगण्यात येते. परंतु इकडे कार्यकर्ते मात्र या आपल्याच सरकारकडून काही पदरात पडेल काय, याच्या प्रतीक्षेत आहेत.

याआधी झाला होता भ्रमनिरासयाआधी युतीचे सरकार असताना शेवटी शेवटी जिल्ह्यातील भाजप, शिवसेना युतीच्या १६ नेते, कार्यकर्त्यांची विविध महामंडळांवर नियुक्ती करण्यात आली. या सर्वांचे विविध संस्थांत अभिनंदन करण्यात आले. सत्कार करण्यात आले. परंतु शेवटपर्यंत याचा शासन आदेश निघालाच नाही आणि संबंधितांना त्यांच्या नियुक्ती झालेले कार्यालयदेखील पाहता आले नाही. असेच यावेळी होऊ नये अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना